Sakal Survey : बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार का?

sakal online maharashtra political crisis survey voting for Will agitate against the shiv sena rebel mla
sakal online maharashtra political crisis survey voting for Will agitate against the shiv sena rebel mla
Updated on

Maharashtra Politics : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. यादरम्यान सकाळ ऑनलाईन सर्व्हेंमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरुन काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये एक प्रश्न होता बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण निदर्शने/आंदोलन करणार का? , त्यावर महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी काय उत्तर दिलं आहे हे आपण आता जाणून घेऊया.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा देणारा तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडले असे, मानणारा शिवसैनिकांचा एक वर्ग पक्षात आहे. बंडखोर आमदारांविरूद्ध रस्त्यावर उतरण्यास हा वर्ग नकार देणार, हे स्वाभाविक आहे. तथापि, या वर्गाहूनही मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून बंडखोरांना विरोध करायचा नाही, असे टक्केवारी सांगते.

निदर्शनांच्या प्रश्नावर जवळपास उभी फुट शिवसैनिकांमध्ये आहे. तिच भावना महाराष्ट्रात सरसकट दिसते आहे. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यात मावणारी गर्दी जितकी आहे, त्याहूनही मोठ्या संख्येने शिवसैनिक एकतर आंदोलन करण्याच्या तयारीत नाही किंवा त्यांचा आंदोलनाचा ठोस निर्णय झालेला नाही.

sakal online maharashtra political crisis survey voting for Will agitate against the shiv sena rebel mla
Sakal Survey : बंडखोरांना मतदान करणार का, २३ टक्के शिवसैनिकांचा कौल धक्कादायक

गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपण निदर्शने/आंदोलन करणार का? या प्रश्नाला आक्रमकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसैनिकांनी या प्रश्नांला दिलेले उत्तर मात्र आश्चर्यकारक आहे. ३४.१% शिवसैनिक रस्त्यावर येऊन आंदोलन किंवा निदर्शने करण्यास नकार देतो, तर १३.६% शिवसैनिक सांगता येत नाही, असे म्हणतात. ५२.३% शिवसैनिक मात्र बंडखोरांविरोधात आक्रमक होऊ असं नोंदवतात.

sakal online maharashtra political crisis survey voting for Will agitate against the shiv sena rebel mla
Sakal Survey: शिवसेनेत जे बंड सुरुयं यावरुन शिवसेनेत फुट पडली असे वाटते काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.