Sakal Program : श्री एम यांच्या मार्गदर्शनाची पर्वणी;‘सकाळ’तर्फे दोन ऑगस्टला पुण्यात विशेष कार्यक्रम

सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरू श्री एम यांचे विचार ऐकण्याची संधी ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिली आहे. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दोन ऑगस्टला केले आहे.
Sakal Program
Sakal Programsakal
Updated on

पुणे : सत्संग फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आणि आध्यात्मिक गुरू श्री एम यांचे विचार ऐकण्याची संधी ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिली आहे. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दोन ऑगस्टला केले आहे.

आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि जागतिक स्तरावरील वक्ते असलेले श्री एम ‘अद्वैत वेदांच्या परंपरेतील सनातन धर्म आणि आंतरिक विश्‍व यांचा शोध’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

या निमित्ताने आत्मभान जागृतीची संधी उपलब्ध झालेली आहे. या माध्यमातून सर्वसामान्यांतील मानसिक आणि स्व-प्रेरणा जागृतीसाठी श्री एम श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. ‘आध्यात्मिक एकांतवास’ तसेच वेद या विषयावर श्री एम यांची जगभरात व्याख्याने होत असतात. ते श्रोत्यांशी संवाद साधतात आणि त्यांच्या विविध शंकाचे निराकरण करतात. हा कार्यक्रम दोन ऑगस्टला कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे.

कार्यक्रमाबाबत...

  • कोठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड

  • कधी : दोन ऑगस्ट

  • वेळ : सायंकाळी साडे पाच वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.