Sakal Survey : काँग्रेसची साथ महाविकास आघाडीसाठी फायद्याची की तोट्याची?

Sakal Survey : काँग्रेसची साथ महाविकास आघाडीसाठी फायद्याची की तोट्याची?
Updated on

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) दोन वर्ष पूर्ण होत आहेत. तसेच राज्यात मध्यावती लागतील, असं वारंवार विरोधकांकडून सांगितलं जातं. त्यातही ठाकरे सरकारने (Thackeray Government) सत्तेची दोन वर्ष पूर्ण केली आहेत. पण, अजून तीन वर्ष बाकी आहेत. यानिमित्त ''सकाळ आणि साम''ने (Sakal Saam Survey) मिळून एक सर्व्हे केला. त्यामधील निकाल चकीत करणारे आहेत.

Sakal Survey : काँग्रेसची साथ महाविकास आघाडीसाठी फायद्याची की तोट्याची?
Sakal Survey : निवडणुका झाल्यास सर्वात मोठा पक्ष कोणता?

राज्यभरात राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सॅम्पल सर्व्हे करण्यात आला. याशिवाय २८८ मतदारसंघात गट चर्चाही घेण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व्हेसाठी २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलेल्या मतदारांची निवड करण्यात आली. हे सॅम्पल निवडताना शहर, ग्रामीण आणि निमशहरी असा समतोल राखला असून महापालिका हद्दीतूनही सॅम्पल निवडण्यात आले. तसेच शिक्षण, आर्थिक, सामाजिक, लिंग, वय हे सर्व निकष लक्षात घेऊन हा सर्व्हे करण्यात आला.

काँग्रेसशिवाय लढल्यास कोण मारणार बाजी? -

सध्या राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तीन मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, काँग्रेसचे नाना पटोले यांनी वेळोवेळी ''एकला चलो'' असा नारा दिला आहे. तसेच अनेकवेळा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र जावे, असं त्यांनी म्हटलंय. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस वगळता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढले. त्याला भाजपचं आव्हान असेल तर नेमका जनतेचा कौल कोणाला मिळणार? याबाबत आम्ही सर्व्हे केला. महाविकास आघाडी काँग्रेसह लढल्यास त्यांना १७८ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडी काँग्रेसशिवाय लढल्यास त्यांना खूप मोठा फरक जाणवतो. काँग्रेसशिवाय लढल्यास महाविकास आघाडीला फक्त ३५ जागा मिळतील.

भाजपच्या जागांमध्ये कमालीची घट -

काँग्रेसशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यास अशा परिस्थितीत भाजपच्या जागांमध्ये मात्र कमालीची घट पाहायला मिळतेय. भाजपला फक्त ६६ जागा मिळतली, असं चित्र सर्व्हेक्षणातून दिसतंय. एकूण सर्वेक्षणातून काँग्रेसशिवाय महाविकास आघाडीची सत्ता येणं कठीण आहे हेच दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.