Ajit Pawar: CM पदासाठी अजितदादा भाजपासोबत जातील? समर्थकांना काय वाटते?

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वपक्षीय समर्थकांचा कल 'सकाळ-साम'ने जाणून घेतला आहे
Ajit Pawar  Sakal-Saam TV Survey 2023
Ajit Pawar Sakal-Saam TV Survey 2023Esakal
Updated on

Sakal-Saam TV Survey 2023

शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा काल मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी आणि समर्थकांनी त्यांना विनंती देखील केली. या संपूर्ण प्रकरणावरून राज्यात सध्या मोठ्या चर्चा, तर्क वितर्क लावले जात आहेत. (Ajit Pawar News)

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वपक्षीय समर्थकांचा कल जाणून घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या समर्थकांचा कल सकाळने समजून घेतला. यामध्ये महिला पुरुषांचा समावेश असून यात सर्व वयोगटातील समर्थकांचा समावेश आहे.

Ajit Pawar  Sakal-Saam TV Survey 2023
Praful Patel: प्रफुल्ल पटेल अध्यक्षपद घेणार नाहीत, जयंत पाटलांच्या नाराजी बद्दल केले मोठे विधान

या संपूर्ण घटनेवर 'सकाळ-साम टीव्ही'ने रिसर्च केला आहे. यामध्ये 'मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार मविआमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करतील, असे वाटते का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देतांना ४२.५% लोकांना वाटत कि, अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत. तर यावर ३३% लोकांना वाटत ते भाजपसोबत जातील. यामध्ये २४.५ % लोक याबद्दल निश्चित सांगू शकलेले नाहीत.

Ajit Pawar  Sakal-Saam TV Survey 2023
Sharad Pawar Resigns: 'तारीख ठरली! समितीचा निर्णय मान्य', राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासंबंधी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी समर्थक म्हणतात

हो 20.51764706

नाही 58.82352941

सांगता येत नाही 20.75294118

या रिसर्चच्या माध्यमातून समर्थकांनी दिलेल्या निष्कर्षानुसार असे दिसून येते की, मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार मविआमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करणार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.