Sakal Social Foundation : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ‘सायकल बँक’मुळे गती

एक हजार सायकलींचे वाटप; प्रकल्पाच्या विस्तारासाठी हव्यात सायकली अन् मदत
Cycle Bank
Cycle Banksakal
Updated on

ग्रामीण व दुर्गम भागात माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. त्यामुळे पालक मुलींना शाळेत पाठवत नाहीत. परिणामी, माध्यमिक स्तरावर शाळा गळतीचे प्रमाण अधिक आहे.

विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून ‘सोशल फॉर ॲक्शन’ अभियानांतर्गत ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः मुलींसाठी ‘सायकल बँक’ प्रकल्प राबविण्यात येत आहे.

सायकल बँक उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी व दुर्गम भागातील किमान पाच कि.मी. पायी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेमार्फत निवड करून अशा विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप करण्यात येते. यामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याकडून ती सायकल पुन्हा शाळेला देण्यात येते, जेणेकरून त्या सायकलीचा वापर पुन्हा एका गरजू विद्यार्थ्याला करता येईल. सायकल बँक प्रकल्पांतर्गत एका वर्षात छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, रायगड व पुणे जिल्ह्यांतील दुर्गम भागातील एक हजार विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.

राज्यातील माध्यमिक स्तरावरील शाळा गळतीचे प्रमाण...

राज्यात सुमारे २३ हजारांहून अधिक माध्यमिक शाळा (एसएससी) व १० हजारांहून अधिक उच्च माध्यमिक शाळा (एचएससी) व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. (स्रोत- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे संकेतस्थळ) राज्यात पहिली ते पाचवी किंवा आठवीपर्यंतच्या एकाच ठिकाणी शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या मोठी आहे.

मात्र, पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण एकाच शाळेत मिळेल, अशा शाळांची संख्या कमी आहे. यूडीआयएसई + (२०२३ -२४) च्या आकडेवारीनुसार राज्यात माध्यमिक स्तरावर (८ वी ते १० वी) शाळा गळतीचे सरासरी प्रमाण ६.२९ टक्के असून, यामध्ये अनुक्रमे मुलांचे ६.१५ व मुलींचे ६.८७ टक्के सरासरी प्रमाण आहे.

याशिवाय उच्च माध्यमिक स्तरावर (११ वी व १२ वी) गळतीचे सरासरी प्रमाण २.९६ टक्के असून, यामध्ये अनुक्रमे मुलांचे ३.८२ व मुलींचे १. ९७ टक्के सरासरी प्रमाण आहे. याचाच अर्थ माध्यमिक स्तरावर (८ वी ते १० वी) शाळा गळतीचे प्रमाण जास्त आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गळतीचे प्रमाण कमी आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ८६०५०१७३६६

आपली सायकल देण्यासाठी आवृत्तीनिहाय संपर्क साधावा

पुणे (८६०५०१७३६६)

अ.नगर (९६२३८०२७०६)

नाशिक (९९२२९२०३४८)

कोल्हापूर (९८८१७४७३४७)

सोलापूर (९८८१७१०९०७)

मुंबई (९८५०२०८१७६)

छ. संभाजीनगर (९८५०२०८१७६)

नागपूर (९८५०२०८१७६)

सायकल बँक प्रकल्पाला अशी करा आर्थिक मदत...

एका नवीन सायकलचा खर्च किमान सात हजार रुपये आहे. ‘सोशल फॉर ॲक्शन’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या सायकल बँक प्रकल्पासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या, औद्योगिक कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, सायकल बँक उपक्रमाची माहिती घेऊन डोनेट नाऊ या बटनावर क्लिक करून थेट वेबसाईटद्वारे देणगी देऊ शकतात. तसेच, या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचे प्रमाणपत्र मिळेल.

टीम SFA

support@socialforaction.com

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

सायकल बँक उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक मुला-मुलींना शाळेत येण्या-जाण्यासाठी सायकली मिळण्यास मदत होऊन, त्यांचा प्रवास सुकर व सुरक्षित होण्यास निश्चित मदत होईल. त्यांच्या शिक्षणाला गती मिळून त्यांचे आरोग्यसुद्धा सुदृढ राखण्यास मदत होईल; सायकल बँक या समाजोपयोगी उपक्रमास सहकार्य करण्यासाठी अनेक संस्था आणि नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.

- संपत सूर्यवंशी, माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र

पाचवीच्या विद्यार्थ्याला सायकल मिळाल्यानंतर तो दहावीपर्यंत किमान पाच वर्षे सायकल वापरू शकतो. तसेच, या उपक्रमांतर्गत दहावी झाल्यानंतर ती सायकल शाळेच्या माध्यमातून दुसऱ्या गरजू विद्यार्थ्याला वापरण्यास देण्यात येते. अशा समाजविधायक व शिक्षणाला पूरक ठरणाऱ्या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी समाजाकडून सामूहिक मदत आवश्यक आहे.

- महेंद्र पिसाळ, विश्वस्त, सकाळ सोशल फाउंडेशन

आपल्या पाल्याची सायकल करा दान

सर्वांनी शालेय व महाविद्यालयीन जीवनात सायकल वापरलेली असते किंवा आपल्या पाल्याला शिक्षणासाठी सायकल घेऊन दिलेली असते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सायकल घरात वापराविना पडून असते. अशा सायकली ज्या आपल्या घरात वापराविना पडून, पण सुस्थितीत आहेत अशा सायकली आपण ‘सायकल बँक’ उपक्रमासाठी देणगी म्हणून देऊ शकता. उपक्रमाच्या माध्यमातून जमा झालेल्या सायकलींचे विविध ठिकाणच्या ग्रामीण भागातील गरजू शालेय विद्यार्थांना वाटप करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.