Sakal Survey 2024: अजित पवार की एकनाथ शिंदे...भाजपाचं नुकसान कोणामुळे? जनतेनं लोकसभेच्या पराभवाचं कारण सांगितलं

Maharashtra Legislative Assembly Election Prepoll Survey 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समुहाचा सर्व्हेक्षण अहवाल जाहीर झाला आहे.
Sakal Survey 2024
Sakal Survey 2024eSakal
Updated on

Maharashtra Prepoll Survey 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समुहाचा सर्व्हेक्षण अहवाल जाहीर झाला आहे. या सर्व्हेमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यामुळं भाजपची अडचण आणि नुकसान झालं आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जनतेनं आपली स्पष्ट मतं व्यक्त केली आहेत. या माहितीतून अनेक धक्कादायक निष्कर्षही समोर आले आहेत.

Sakal Survey 2024
Sakal Survey 2024: विद्यमान आमदारांची धाकधूक वाढणार; सर्वेक्षणातून समोर आला जनतेचा कौल

महायुतीमध्ये सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला झाला आहे? या प्रश्नावर राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये रँडम सॅम्पल घेण्यात आलं. यामध्ये शिवसेनेला (शिंदे) ३७.२ टक्के, राष्ट्रवादी (अजित दादा) २२.९ टक्के, भाजप ३१.२ टक्के आणि इतर सर्व घटक पक्षांना समान फायदा जो ८.७ टक्के इतका झाल्याचं समोर आलं आहे.

त्याचबरोबर महायुतीत मित्र पक्षांमुळं भाजपचं नुकसान झालं का? या प्रश्नावर २५.६ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं आहे. तर अजित पवारांमुळं नुकसान झाल्याचं २२ टक्के लोकांनी म्हटलं आहे. दोघांमुळं नुकसान झाल्याचं १९.७ टक्के लोकांनी म्हटलंय. भाजपच्या राजकारणामुळं नुकसान झाल्याचं १३.७ टक्के लोकांनी म्हटलं आहे. तर १३.५ टक्के लोकांनी भाजपचं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. तर एकनाथ शिंदेंमुळं भाजपला नुकसान झाल्याचं उर्वरित लोकांनी म्हटलं आहे.

Sakal Survey 2024
Sakal Survey 2024: महाराष्ट्राच्या CM पदासाठी पसंती कोणाला? शिंदे, अजितदादांपेक्षा या दोन नेत्यांमध्ये तगडी फाईट

या आकडेवारीचं विश्लेषण केल्यानंतर हे स्पष्ट होतंय की, महायुतीत भाजपपेक्षा शिवसेनेला जास्त फायदा झाल्याचं दिसतं आहे. पण महायुतीत अजित पवारांचा राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष हा एक महत्वाचा घटक पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात बसलेल्या जोरदार झटक्यामुळं अजित पवारांना सोबत घेतल्याचा परिणाम असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. भाजपतील विविध नेते पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना महायुतीत घेण्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळं महाराष्ट्रात सध्या सकाळच्या सर्व्हेमध्ये जे दिसून आलं आहे. त्यातून भाजपची अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळं आणखीनच अडचण झाल्याचं दिसून येत आहे.

Sakal Survey 2024
Sakal Survey 2024 : मविआ की महायुती? लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र कुणासोबत? 'सकाळ' सर्व्हेतून उघड झाला मतदारांचा कौल

त्यामुळं गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपनं एकत्र निवडणूक लढवल्यानंतर भाजपला १०५ जागा मिळाल्या होत्या आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण यंदाचा लोकांचा कल पाहता यामध्ये शिवसेनेला (विभाजित) सर्वाधिक फायदा होईल, असं वाटतंय. तर भाजपला नुकसान होईल असं सर्व्हेतील कलांमधून दिसत असलं तरी निवडणुकीनंतर ही परिस्थिती कायम राहिलं हे पाहावं लागणार आहे.

सकाळच्या या सर्व्हेमध्ये राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील ८४,५२९ मतदारांशी संवाद साधण्यात आला आहे. यामध्ये ६८ टक्के पुरुष तर ३१ टक्के महिलांचा समावेश आहे, तसंच १ टक्के इतरांचा समावेश आहे.

Maharashtra Legislative Assembly Election Prepoll Survey
Maharashtra Legislative Assembly Election Prepoll SurveyeSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.