Sakal Survey 2024 : पक्ष आणि त्यांच्यासाठीचा मतदारांचा संदेश

‘सकाळ माध्यम समूहा’च्या राज्यव्यापी सर्वेक्षणात प्रत्येक पक्षाबद्दलच्या भावना मतदारांनी मांडल्या. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्षांबाबत मतदार स्वतंत्रपणे विचार करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले
Sakal Survey 2024
Sakal Survey 2024sakal
Updated on

‘सकाळ माध्यम समूहा’च्या राज्यव्यापी सर्वेक्षणात प्रत्येक पक्षाबद्दलच्या भावना मतदारांनी मांडल्या. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील घटक पक्षांबाबत मतदार स्वतंत्रपणे विचार करत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनात राजकीय पक्षांबद्दल नेमके काय चालले आहे, यावर दृष्टिक्षेप...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व केवळ भाजप विरोधापुरते मर्यादित झाल्यासारखे वाटते.

  • इतर घटक पक्षांच्या तुलनेत मतदार किंवा जागांमध्ये वाढ दिसत नाही.

  • प्रतिमा निर्मिती (perception) मध्ये ‘मविआ’ पूरक आहेत; पण हिंदुत्व किंवा विचारधारेच्या मुद्द्यावर स्वतंत्र अस्तित्व नाही.

  • उद्धव ठाकरेंची लोकप्रियता कायम; पण लोकप्रियतेचे मतदानात रूपांतर आवश्यक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)

  • ग्रामीण भागात सहानुभूती कायम आहे.

  • मराठा मतदारांचा वाढता पाठिंबा आहे.

  • विद्यमान आमदारांवर नाराजी आणि पक्ष फुटीनंतरची सहानुभूती पथ्यावर पडली आहे.

  • महाविकास आघाडीत असल्याचा लाभ झाला आहे.

  • सुप्रिया सुळे यांच्या लोकप्रियतेत वाढ (विशेषतः शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ला मानणारा महिला वर्ग) झाली आहे.

काँग्रेस

  • महाविकास आघाडीचा सर्वांत मोठा लाभार्थी पक्ष आहे.

  • महाराष्ट्रात नेतृत्व कोणाकडे याबद्दल स्पष्टता नाही.

  • दलित- आदिवासी मतदारांचा पाठिंबा आहे.

  • मुस्लिम मतदार एकतर्फी काँग्रेसच्या बाजूने आहेत.

  • सर्वच जाती घटकांतील अल्प उत्पन्न गटांचा वाढता पाठिंबा आहे.

  • विद्यमान आमदारांबद्दलची नाराजी पथ्यावर पडते आहे.

भाजप 

  • राज्यातील नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते.

  • सर्वपक्षीय मतदार भाजपचे नेतृत्व म्हणून नितीन गडकरी यांना पसंती देतात.

  • पक्षाचा कोअर मतदार कायम, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय महिलांमधील जनाधार टिकून आहे.

  • ओबीसी आणि व्हीजेएनटी मतदार गट बाजूने; तर मराठा मतदारांची नाराजी कायम आहे.

  • दलित आणि आदिवासी मतदारांचा पाठिंबा घटलेला आहे.

  • ग्रामीण मतदारांमध्ये नाराजी आहे.

शिवसेना

  • महायुतीचा सर्वाधिक लाभार्थी पक्ष ठरला आहेत.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उजळली आहे.

  • संवेदनशील मुख्यमंत्री अशी प्रतिमा निर्माण झाली आहे.

  • शिवसेनेच्या पारंपरिक प्रभाव क्षेत्रात (मुंबई वगळता) जनाधार कायम ठेवला आहे.

  • भाजप मतदारांची थेट नाराजी शिंदेंविरोधात नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस

  • - स्थानिक नेतृत्वावर भिस्त; मात्र अँटी इन्कम्बन्सीचा धोका आहे.

  • - पक्ष नेतृत्वाचा (अजित पवार) प्रभाव मर्यादित क्षेत्रात आहे.

  • - महायुतीमध्ये ना घटक पक्षांना लाभ ना स्वतःला अशी परिस्थिती आहे.

  • - अजित पवार यांच्यामुळे भाजपचे नुकसान झाल्याचे ‘पर्सेप्शन’ ठळकपणे समोर आले

  • - भाजपला मानणाऱ्या मतदाराला अजित पवारांसोबत युती नको असल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.