Maharashtra Legislative Assembly Election Prepoll Survey: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली असताना सकाळ माध्यम समूहाने राज्यव्यापी सर्वेक्षणातून महाराष्ट्रातील राजकीय वातावरणाचा अंदाज घेतला. या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की महाराष्ट्रातील मतदारांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तर विद्यमान आमदारांबाबत देखील मतदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सकाळ माध्यम समूहाच्या सर्वेक्षणानुसार, ४८.७ टक्के मतदार महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवतात. पक्षांच्या पसंतीमध्ये, भाजपला २८.५ टक्के मतदारांची पसंती आहे. महाविकास आघाडी कायम रहावी असे मत नोंदवणारे मतदार म्हणतात की काँग्रेसला सर्वाधिक लाभ झाला आहे. दुसरीकडे, महायुतीचा सर्वाधिक लाभ शिवसेना (एकनाथ शिंदे) ला झाला आहे असे मत नोंदवण्यात आले आहे. (Maharashtra Legislative Assembly Election Prepoll Survey)
सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या "आपल्या मतदार संघातील आमदाराला पुन्हा निवडून देणार का?" या प्रश्नावर मतदारांनी दिलेल्या उत्तरांमध्ये विद्यमान आमदारांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. ४२.४ टक्के मतदार विद्यमान आमदारांच्या कामगिरीबद्दल नाराज आहेत, तर ४१.१ टक्के लोकं आमदारांना पुन्हा निवडून देणार नाहीत असे नोंदवतात. याशिवाय, २२.७ टक्के लोकांनी "सांगता येत नाही" हा पर्याय निवडला. ३६.२ टक्के लोकांनी विद्यमान आमदाराला एका संधी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
सर्वेक्षणानुसार, पक्षांच्या पसंतीमध्ये भाजपला सर्वाधिक २८.५ टक्के मतदारांची पसंती आहे. काँग्रेसला २४ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना १४ टक्के, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला ११.७ टक्के, शिवसेना (शिंदे) ला ६ टक्के, तर इतर राष्ट्रवादी पक्षाला ४.२ टक्के समर्थन आहे.
सर्वेक्षणासाठी संमिश्र संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघातून ८४,५२९ मतदारांशी संवाद साधण्यात आला. या सर्वेक्षणात सकाळचे दोन हजारांवर सहकारी सहभागी झाले होते. मतदारांची निवड करतांना ४८ लोकसभा मतदारसंघांना २८८ विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागांची प्रभाग आणि जिल्हा परिषद गट अशी विभागणी करण्यात आली. भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आले आहेत. यासाठी स्तरीय यादृच्छिक नमुना (Stratified Random Sampling) संशोधन पद्धत वापरण्यात आली.
(Maharashtra council Prepolls Survey)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.