मुंबई - राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात खिचडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार अचानक शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे गोंधळ उडल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत भारत राष्ट्र समितीने अर्थात बीआरएसने गाजावाजा करत महाराष्ट्रात एंट्री केली. मात्र बीआरएस खरच चमत्कार करणार का याबाबत 'सकाळ'ने केलेल्या सर्व्हेत महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने ६०० गाड्यांच्या ताफ्यासह पंढरपूर गाठले होते. त्यामुळे बीआरएसची मोठी चर्चा झाली होती. त्यामुळे बीआरएस राज्यात धुमाकूळ घालणार अशी चर्चा होती. खुद्द अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर 'सकाळ' सर्व्हेमध्ये बीआरएसबाबत प्रश्न विचारण्यात आला.
सर्व्हेनुसार, राज्यात भाजपला सर्वाधिक २६.८ टक्के मतदरांनी भाजपला पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेसला १९.१ टक्के, राष्ट्रवादी शरद पवार १४.९ टक्के, राष्ट्रवादी अजित पवार ५.७ टक्के, एकनाथ शिंदे ४.९ टक्के, उद्धव ठाकरे १२.७ टक्के, मनसे २.८ टक्के, शेकाप ०.४ टक्के, वंचित २.८ टक्के, एआयएमआयएम ०.४ टक्के, स्वाभिमानी शेतकरी संघटना ०.३ टक्के, प्रहार ०.३ टक्के, बविआ ०.६ टक्के, केसीआर ०.८ टक्के, आप ०.७ टक्के, अपक्ष १ टक्का, इतर ५.५ टक्के पसंती आहे.
सर्व्हेनुसार, केसीआर यांच्या पक्षाला अवघी ०.८ टक्के पसंती मिळाली आहे. अर्थात निवडणुकीला आणखी वर्ष बाकी आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात बीआरएस चमत्कार करेल हे पाहवं लागेल. तसेच बीआरएस पक्षाचे राज्यातील नेतृत्व पक्ष संघटन वाढवण्यात किती प्रभावी ठरतं, हेही पाहणं औत्युक्याच ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.