Sakal Survey: महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सातत्याने धक्कादायक घडामोडी घडत आहे. या घडामोडींना खरी सुरुवात 2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झाली.
त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. साडेतीन वर्षांपूर्वी ‘पहाटेच्या शपथविधी’ सोहळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार यांना जे राजकारण जमवता आले नव्हते, ते अखेर त्यांनी केले.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात आणखी एक उपमुख्यमंत्री तसेच नऊ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून साडेतीन वर्षांतील तिसरा शपथविधी होता. महाराष्ट्राच्या राजकारणात इतकी अनागोंदी जनतेने कधीही पाहिली नव्हती.
सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्रातील मतदारांना काय वाटतं? याचं सर्वेक्षण 'सकाळ'ने केलं आहे. यामध्ये सामान्य जनतेच्या भावना जाणून घेण्यात आल्या.
'सकाळ' सर्वेक्षणामध्ये सकाळच्या राज्यभरातील बातमीदारांनी या महासर्वेक्षणासाठी काम केले. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघ, 48 लोकसभा मतदारसंघातून समाजाच्या सर्व स्तरातून 74 हजार 330 मतदारांचे मत विचारात घेण्यात आले आहे.
'सकाळ'ने केलेल्या या सर्वेक्षणात 'लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र झाल्या तर दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मतदान करणार का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता.
यामध्ये 47.9 % मतदारांनी 'हो' असे उत्तर दिले आहे तर 27.3 % मतदारांनी 'नाही' असे उत्तर दिले आहे. 24.8 % मतदारांनी 'सांगता येत नाही' असे उत्तर दिले आहे.
या प्रश्नावर मतदारांनी दिलेला कल पाहता लोकसभा आणि विधानसभेसाठी एकाच पक्षाला पसंती मिळताना दिसत आहे.
मतदारांनी कोणत्या पक्षाला आपला कल दिला आहे हे देखील या सर्व्हेमध्ये स्पष्ट झाले आहे. जर विधानसभा लोकसभा एकत्र झाली तर जनता भाजपला मतदान करणार का याबद्दलचा कल देखील घेण्यात आला .
या सर्व्हेमध्ये 65% मतदार भाजपच्या पाठीशी असल्याचं दिसून आलं. तर 19% जनता लोकसभा विधानसभा एकत्र झाली तर भाजपला मतदान करणार नसल्याचा कौल देताना दिसली आहे. मात्र 16% मतदारांचा कल स्पष्ट नसल्याचं सिद्ध झालं.
एकूणच अनेक राजकीय पंडितांच म्हणणं आहे की जर लोकसभा विधानसभा एकत्र घेणे हे पंतप्रधान मोदींसाठी फायद्याचे ठरणार आहे आणि दोन्ही निवडणुका राष्ट्रीय मुद्दयावर होण्याची शक्यता जास्त आहे. सकाळने घेतलेल्या सर्व्हेमध्ये हेच सिद्ध होताना दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.