2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील राजकीय पक्ष चांगलेच सक्रिय दिसत आहेत. राजकीय गोंधळात सर्वच पक्ष आपापले दावे करत आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या विजयाची बढाई मारत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात सकाळने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. (Lok Sabha Elections Survey in Maharashtra)
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयसाठी कसरत करावी लागेल. भाजपच्या मित्रपक्षांना मोठा फटका बसणार आहे. सकाळने मतदार राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कामावर समाधानी आहात का? याबाबत जाणून घेतले आहे.
केंद्र सरकारच्या कामगिरीवर महाराष्ट्रातील मतदार पूर्णपणे समाधानी नाही. ४०.४ टक्के मतदार कामगिरीबद्दल समाधानी असल्याचा कौल नोंदवतात; त्याचवेळी ४४.५ टक्के मतदार कामगिरीबद्दल मोकळेपणाने नाराजी व्यक्त करतात.
कामगिरीबद्दल नेमकेपणाने मत नसलेल्या मतदारांचे प्रमाण १५.२ टक्के आहे. केंद्र सरकार आपली कामगिरी मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर स्पष्टपणे 'कामगिरीबद्दल समाधानी नाही', हा मुद्दा महाराष्ट्र नोंदवतो. Latest Marathi News
राज्य सरकारची कामगिरी समाधानकारक नसल्याचे बहुसंख्य म्हणजे ५०.२ टक्के मतदारांनी स्पष्टपणे सर्वेक्षणात मांडले. समाधानकारक कामगिरी असल्याचे मत ३३.६ टक्के मतदारांनी नोंदवले. सांगता न येणाऱ्या मतदारांचे प्रमाण १६.२ टक्के आहे. केंद्र आणि राज्य यांच्या कामगिरीची तुलना केली, तर महाराष्ट्रात मोदी सरकारच्या कामाचा प्रभाव अधिक दिसतो आहे. त्यामानाने एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारबद्दल निम्म्या मतदारांची निराशा समोर आली आहे.
खासदारांच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारला असता ५०.६ टक्के लोकं खासदारांबद्दल नाराजी व्यक्त करतात तर ३२.३ टक्के लोक समाधान व्यक्त करतात. १७ टक्के लोक सांगता येत नाही असे म्हणतात. सध्याच्या खासदारांच्या कामाच्या मूल्यमापनाचे हे आकलन खूप बोलके आहे. दोन पक्षात पडलेली फूट आणि विद्यमान खासदारांबद्दलची नाराजी यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला नवीन चेहरे बघायला मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको.
खासदारांच्या कामाबद्दल ५० टक्के हुन अधिक मतदार नाराजी नोंदवतातच. शिवाय ४९.८ टक्के लोकांना त्यांना पुन्हा निवडून द्यावे असे वाटत नाही. केवळ ३०.६टक्के मतदारांना उमेदवाराला अजून एक संधी द्यायला हवी असे वाटते.
खासदारांच्या कामगिरीचे मुल्यमापन करताना महाराष्ट्रातील मतदार खासदार निधीतून केलेल्या कामाकडे बारकाईने पाहतो आहे, हे सर्वेक्षणातून समोर आले. २१.१ टक्के मतदारांना हा मुद्दा प्राधान्याचा वाटला. आपल्या लोकप्रतिनिधीची संसदेतील हजेरी (२०.१ टक्के), सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी खासदारांनी केलेली मदत (१४.३ टक्के), जनसंपर्क (११.५ टक्के) आणि संसदेतील खासदारांचे मुद्दे- भाषणे (११.४ टक्के) हे घटकही मतदारांना महत्वाचे वाटतात. खासदारकीनंतर पाच वर्षे मतदारसंघात फिरकायचे नाही, हा प्रकार खपवून घेणार नाही, हे आजचा मतदार स्पष्टपणे सांगतो आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.