Sakal Survey Loksabha 2024: पश्चिम महाराष्ट्राचा फुटीला कौल की विरोध? जातीय समीकरणे महत्त्वाची पण लढत काट्याची

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यावर बदलेल्या राजकीय समीकरणाचा परिणाम झाला आहे की नाही हे आगामी काळच ठरवेल.
Paschim Maharashtra Loksabha
Paschim Maharashtra LoksabhaSakal
Updated on

- शीतल पवार, अभय दिवाणजी, प्रकाश पाटील, प्रमोद बोडके

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर पुणे जिल्ह्यावर बदलेल्या राजकीय समीकरणाचा परिणाम झाला आहे की नाही हे आगामी काळच ठरवेल. अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतील मतदारसंघांबाबतही राजकीय उत्सुकता आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पुणे शहर लोकसभा मतदारसंघ २०१४ मध्ये भाजपकडे गेला. यंदाच्या लोकसभेला ‘मविआ’च्या तुलनेत भाजप संघटन पातळीवर अधिक सक्षम आणि सिद्ध असल्याचे चित्र याक्षणी आहे. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा झाल्यावर निवडणुकीत रंगत येईल. चर्चेत नावे अनेक आहेत; पण पक्ष म्हणून हक्काच्या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करताना आगामी काळासाठी भाजपचा मेसेज काय असेल, हे निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरवणारे ठरेल.

Paschim Maharashtra Loksabha
Sakal Survey loksabha 2024: भाजप नंबर १ पण महायुतीमुळे वाट्याला काटे? ‘मविआ’ ला असा होणार फायदा

बारामती:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर देशाच्या नजरा बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आहेत. सलग तीनदा खासदार झालेल्या सुप्रिया सुळे यांना यंदा पवार कुटुंबातील सदस्य सुनेत्रा पवार यांचे आव्हान असेल, अशी आजची शक्यता आहे. अशीच लढत झाली तर बारामती तालुक्यात मतांचे थेट विभाजन होईल. याशिवाय बारामती तालुक्यासह लोकसभा मतदारसंघातील इतर ग्रामीण भागातही शरद पवार यांना मानणारा किंवा सहानुभूती बाळगून असणारा वर्ग आहे.

परिणामी दौंड, खडकवासला, इंदापूर आणि पुरंदर इथे मतांची आघाडी मिळवायला आणि घडाळ्याच्या चिन्हावर उमेदवार विजयी करण्यासाठी अजित पवारांना ‘कमळा’ची म्हणजेच भाजपची साथ लागणार आहे. भोर-वेल्हा-मुळशीसह एकूण मतदारसंघात ‘मविआ’ची ताकद एकत्र करण्यासाठी शरद पवार काम करत आहेत.

Paschim Maharashtra Loksabha
Sakal Survey Lok Sabha 2024: शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांवर भारी? लोकसभेत महाराष्ट्र कुणासोबत?

शिरूर -

राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजयरथ रोखला. २०१९ च्या निवडणुकीवेळी सुरू असलेल्या कोल्हे यांच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा निवडणूक निकालावर सर्वाधिक परिणाम होता, अशी चर्चा झाली. निकालानंतर मात्र त्यांच्यावर या अभिनय क्षेत्रामुळे टीका झाली. ती आज पक्ष फुटल्यानंतरही कायम आहे. संसदेतील कामगिरी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न, पुणे-नाशिक रस्ता, बैलगाडा शर्यत असे कोल्हे यांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका पार पाडणाऱ्या कोल्हेंची लोकप्रियता कायम असली तरी निवडणुकीच्या राजकारणात पक्षात फूट पडल्यानंतर मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यात त्यांच्या निवडणूक कौशल्याचा कस लागेल. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुन्हा संधी मिळणार की भाजप आणखी नवीन डाव टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आढळरावांना संधी मिळाली तर सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांना प्रयत्न करावा लागेल.

अहमदनगर, शिर्डीकडे लक्षवेधी

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी पक्की असल्याचे सांगितले जातेय. हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याचा आहे. त्यामुळे भाजप ही जागा अजित पवार किंवा शिंदे गटाला सोडणार नाही, हे नक्की. भाजपकडून सुजय विखे रिंगणात असतील तर वर्षभरापासून लोकसभेची तयारी करणाऱ्या आमदार नीलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके यांना शरद पवार गटात जावे लागेल. असे झाल्यास विखे- लंके ही ‘फाईट टाईट’ होईल.

दुसरीकडे शिर्डी विधानसभा लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव. मोदी लाटेवर शिवसेनेकडून दोन वेळा सदाशिव लोखंडे खासदार झाले. आता मात्र तसा फायदा होईल असं वाटत नाही. तसेच लोखंडे यांच्यावर मतदारसंघात नाराजी आहे. तसेच महाविकास आघाडीचे मातब्बर विजयासाठी ताकद पणाला लावतील, त्यामुळे येथील लढत काट्याची होईल, यात तिळमात्र शंका नाही.

Paschim Maharashtra Loksabha
Sakal Survey Loksabha 2024: सेनेचं मतदान घटणार... पण ठाकरेंना होणार फायदा! शिंदेंच काय? 'सकाळ'च्या सर्व्हेत मोठी माहिती समोर...

सोलापूर,माढा: उमेदवार महत्त्वाचा

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराच्या विरोधात भाजपला स्थानिक तरुण आश्‍वासक चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. या मतदारसंघात ‘गेटकेन’ उमेदवारास विरोध होण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. अद्याप भारतीय जनता पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्राचा घोळ मिटला नसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत साशंकता आहे.

माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे, उत्तम जानकर अशा नावांची उमेदवार म्हणून चर्चा आहे. परंतु धक्कादायक उमेदवार देण्याची भाजप नेत्यांचा मनसुबा आहे. त्याचवेळी माढा लोकसभेतील सहापैकी सहा विधानसभा मतदारसंघात सध्या ‘महायुती’चेच प्राबल्य आहे. उमेदवारीसाठी अनेक तगडे पर्यायही आहेत. भाजप अन्‌ महायुतीच्या नेत्यांमध्ये असलेली गटबाजी ही खरी डोकेदुखी सध्या भाजपला सतावत आहे. माढ्यात खासदार राहिलेले शरद पवार मात्र सध्या माढ्याच्या बाबतीत निर्धास्त दिसत आहेत. माढ्यात मराठा आणि धनगर मते निर्णायक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.