Sakal Survey Lok Sabha 2024 Latest News : लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. देशातील सर्व राजकीय पक्षांकडून निवडणूकांची तयारी केली जात आहे. येत्या काही दिवसात अचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणूकांच्या आनुषंगाने सकाळ मीडिया ग्रुपच्या वतीने एक सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मूड मूड नेमका काय आहे, हे समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही दिवसांपूर्वी उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थिती बघता जनतेला नेमका कौल जाणून घेण्याचा 'सकाळ'ने प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या दोन गट पाहायला मिळत असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान सर्वेक्षणात आगमी लोकसभा निवडणूक (२०२४) मध्ये आपण कोणत्या पक्षाची निवड कराल असा प्रश्न विचारण्यात आला होता.
३४,९७८ लोकांनी या सर्वेक्षणात आपली मतं मांडली असून यामध्ये १२.६ टक्के लोकांचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार या पक्षाला देण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार यांच्या पक्षाला ३.९ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे पक्षफुटीचे नुकसान अजित पवार यांना जास्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वेक्षणात सर्वाधिक पसंती भाजपला (३३.६टक्के) त्याखालोखाल काँग्रेस (१८.५ टक्के) , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(१२.६ टक्के), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (१२.५ टक्के) या पक्षांना मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे) अनुक्रमे ३.९ टक्के आणि ४.९ टक्के असा कल मिळालेला दिसतो. वंचित बहुजन आघाडीला ३.६ टक्केअसा कल मिळालेला दिसतो. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षांतर्गत फुटीचा परिणाम या दोन्ही पक्षांच्या मुळ मतांच्या विभाजनावर होणार आहे असे दिसते.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मतांची आकडेवारी बद्दल बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी पक्षाने १९ जागांवर निवडणूक लढवली होती, ज्यापैकी ४ जागा जिंकण्यात पक्षाला यश मिळालं. यामध्ये राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांची टक्केवीर १५.६६ होती. त्यामुळे आता समोर आलेल्या सर्वेक्षणात देखील पक्षाला जवळपास तेवढेचं मतं मिळताना दिसत आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांना मिळालेल्या पसंतीच्या टक्केवारीची बेरीज १६.६ टक्के इतकी होतेय. मात्र पक्षात दोन गट पडल्याने पक्षाचे मतदार विभागल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या फुटीचा फटका अजित पवार गटाला जास्त बसताना दिसत आहे.
या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघ विधानसभा निहाय विभागून यादृच्छिक पद्धतीने नमुना निवड (रॅन्डम सॅम्पलिंग) करण्यात आली आहे. याअंतर्गत लिंग, वय, जात, धर्म, कुटुंबाची आर्थिक स्थिती, वेगवेगळे उत्पन्न गट, सरकारी योजनांचे लाभार्थी, नव मतदार असे निकष निश्चित केले होते. तसेच सर्वेक्षणात २०२४ च्या उमेदवारांबद्दल कल समजून घेण्यात आलेला नाही. मात्र सर्वेक्षण सध्याच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल कल सांगणारे आहे. त्यामुळे उमेदवार घोषित झाल्यावर, स्थानिक युती - आघाडीचे गणित निकालावर परिणाम करणारे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.