Sakal Survey : बंडाचा फंडा काँग्रेसच्या पथ्यावर! 'सकाळ'च्या सर्व्हेत मतदारांची पसंती वाढल्याचं निरीक्षण

Nana Patole and Rahul Gandhi
Nana Patole and Rahul Gandhi
Updated on

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सतात्याने भूकंप होत आहेत. आधी एकनाथ शिंदे आणि आता अजित पवार यांनी बंड केलं. या दोन्ही बंडामध्ये भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण होती. खुद्द फडणवीसांनीच शिवसेनेत बंड घडवून आणल्याची कबुली दिली होती. या दोन्ही बंडांचा भाजपला पुन्हा सत्तेत येण्यास फायदा झाला असली तरी पुढील काळात याचा काँग्रेसला अधिक फायदा होणार असल्याचं 'सकाळ सर्व्हे'तून समोर आलं आहे.

Nana Patole and Rahul Gandhi
Sakal Survey : गाजावाजा करत महाराष्ट्रात एंट्री! BRS खरंच चमत्कार करणार? सर्व्हेत जनता म्हणते...

राज्यात झालेल्या बंडांपासून सध्या तरी काँग्रेस सुरक्षीत आहे. मात्र अधुनमधून काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत राहतात. याला ठोस पुरावा नाही. मात्र राज्यात झालेल्या दोन्ही बंडांचा काँग्रेसला फायदा होणार असं सध्याचं चित्र आहे.

सकाळच्या सर्व्हेनुसार, राज्यात भाजपला सर्वाधिक २६.८ टक्के मतदरांनी पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेसला १९.१ टक्के, राष्ट्रवादी शरद पवार १४.९ टक्के, राष्ट्रवादी अजित पवार ५.७ टक्के, एकनाथ शिंदे ४.९ टक्के, उद्धव ठाकरे १२.७ टक्के, मनसेला २.८ टक्के पसंती दर्शवली आहे.

Nana Patole and Rahul Gandhi
Sakal Survey : 'एकला चलो रे' म्हणणाऱ्या राज ठाकरेंची जादू 2024मध्ये तरी चालणार का?

सर्व्हेत काँग्रेसला मिळणाऱ्या पसंतीची टक्केवारी वाढल्याचं दिसून येत आहे. अर्थात दोन्ही बंडांचा फायदा काँग्रेसला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कर्नाटकमध्ये मिळवलेल्या विजयापासून काँग्रेसमध्ये चैतन्य आलं आहे. महाराष्ट्रातही याचे परिणाम दिसत असल्याचं चित्र असले तरी काँग्रेस निवडणुकीपर्यंत कशी कामगिरी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागल्यामुळेही काँग्रेस क्रमांकावर आल्याचं स्पष्टच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.