महाविकास आघाडी की भाजपा, निवडणूक झाल्यास सत्ता कोणाची?

महाविकास आघाडी की भाजपा, निवडणूक झाल्यास सत्ता कोणाची?
Updated on
Summary

राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राज्यात कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल? त्यातही स्वतंत्र लढल्यास कोणता पक्ष बाजी मारेल आणि महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली तर काय निकाल असतील असे प्रश्न सर्व्हेत विचारले होते.

राज्यात युती तुटल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारला दोन वर्षे पूण झाली. गेल्या दोन वर्षात भाजपकडून हे सरकार लवकरच कोसळेल असा दावा केला जात होता. अजुनही भाजप नेत्यांकडून असा दावा केला जातोय. दरम्यान सरकार २८ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण करत असून त्यानिमित्त 'सकाळ'ने राज्यातील सर्व मतदारसंघातून सर्व्हे घेतला आहे. यात राज्यात मध्यावधी झाल्यास कोण निवडून येईल, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण, सरकार कोणत्या आघाड्यांवर, कोणते प्रश्न हाताळण्यात यशस्वी ठरले इत्यादी प्रश्न विचारण्यात आले होते.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल याच्या चर्चा सतत होत असतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीसुद्धा महाविकास आघाडीचं सरकार येत्या मार्च महिन्यात कोसळेल असा दावा नुकताच केला आहे. समजा राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राज्यात कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल? त्यातही स्वतंत्र लढल्यास कोणता पक्ष बाजी मारेल आणि महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली तर काय निकाल असतील असे प्रश्न सर्व्हेत विचारले होते. यावर महाराष्ट्रातील जनतेनं उत्तर देताना सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढल्यास भाजपला सर्वाधिक पसंती दिली आहे.

महाविकास आघाडी की भाजपा, निवडणूक झाल्यास सत्ता कोणाची?
महासर्वेक्षण: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? काय म्हणतो सर्व्हे?

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली तर काय असंही सर्व्हेमध्ये विचारण्यात आलं होतं. यात सर्वाधिक महाविकास आघाडीला ३९.८ टक्के पसंती दिली आहे. तर आघाडीविरुद्ध भाजपला मत देणाऱ्यांचे प्रमाण २७.५ टक्के इतकं आहे. शिवाय काँग्रेसला वगळून शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी झाली तरीही त्यांना फक्त १९.८ टक्के कौल दिला आहे. भाजपला दूर ठेवायचं असेल तर महाविकास आघाडीला एकत्र निवडणूक लढवावी लागेल असाच सूर सर्व्हेमध्ये दिसून आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीसुद्धा महाविकास आघाडीने निवडणूक एकत्र लढवल्यास विजय मिळेल असं दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

महाविकास आघाडी की भाजपा, निवडणूक झाल्यास सत्ता कोणाची?
Sakal Survey : निवडणुका झाल्यास सर्वात मोठा पक्ष कोणता?

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात हा सॅम्पल सर्व्हे केला गेला. तसंच गट चर्चासुद्धा घेतली गेली. मिक्स्ड मेथडॉलॉजीचा वापर करून हा सर्व्हे करण्यात आला आहे. यासाठी विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेल्या मतदारांमधून रँडम असे सॅम्पल निवडण्यात आले होते. सॅम्पल निवडत असताना शहर, ग्रामीण आणि निमशहरी असा समतोल राखण्यात आला. तसंच महापालिकेच्या हद्दीतील मतदारांकडून मते जाणून घेतली. याशिवाय सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्यांचे शिक्षण, आर्थिक सामाजिक बाजू, लिंग, वय इत्यादी निकषही लक्षात घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()