#SakalForMaharashtra शिक्षण आणि उद्योग क्षेत्राने एकत्र यावे 

Raghunath Mashelkar
Raghunath Mashelkar
Updated on

पारंपरिक पद्धतीचे काम वा रोजगार भविष्यात संपत जातील. परंतु वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे असंख्य नवे रोजगारही निर्माण होतील. त्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ तयार होण्यासाठी शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला पुढे यावे लागेल.

#SakalForMaharashtra

सरकारी धोरण त्यासाठी अनुकूल करावे लागेल. कौशल्य देण्यासाठी आणि बदलत्या तंत्रज्ञानाबाबत संशोधन करण्यासाठी उद्योगांना सक्रीय भागीदाराची भूमिका पार पाडावी लागेल. भारतीय युवक हा आश्‍वासक आहे. त्याला भविष्यातील रोजगाराचे स्वरुप समजले पाहिजे. या तरुणांना उत्तेजन तसेच भविष्यातील नवरोजगाराची माहिती देण्यासाठी उच्च गुणवत्तेची करियर मार्गदर्शन केंद्रे आपल्याला उभारावी लागतील. उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यात योगदान देऊ शकेल. भारताची ग्राहक बाजारपेठ मोठी आहे. त्याचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. आपल्या देशात परकी गुंतवणुकीला परवानगी देताना त्यांच्याकडील नवतंत्रज्ञान आपल्याला हस्तांतर करावे, ही अट घातली गेली पाहिजे.

चीनने हा प्रयोग केला आहे. यातूनही रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकेल. केंद्र आणि राज्य सरकारांनी देखील बदलत्या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी धोरणात्मक बदल करावेत. या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये अडथळे येतील, अशा प्रकाराची बंधने घालू नयेत. केंद्र सरकार स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देत आहेच. कृषीतंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअपमुळे देखील देशातील शेती विकास आणि उत्पादकता वाढीला चालना मिळू शकते. यातून शेतीखर्चात कपात होऊ शकेल. तंत्रज्ञानाचा वापरामुळे शेतीमाल पुरवठ्याची साखळी तसेच शेतीला बाजारपेठेला जोडण्यासाठी मदत होऊ शकेल. यातूनही अनेक रोजगार निर्माण होऊ शकतील. 

संबंधित बातम्या :
#SakalForMaharashtra समाजासाठी सरसावला समाज
#SakalForMaharashtra एकत्र येऊया ! मार्ग काढूया !!
#SakalForMaharashtra मी तयार आहे, आपणही पुढे या!​
#SakalForMaharashtra कामगार कौशल्य विकास काळाची गरज: श्रीकांत परांजपे
#SakalForMaharashtra ‘एकत्र येऊया...’साठी सरसावले लाखो हात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.