'ज्यांना बाळ नको आहे त्यांनी...' बालकांना बेवारस सोडणाऱ्यांना संस्थेचं आवाहन

अनाथ बाळांना ‘नाथ’ द्या! रस्त्यावर सोडून देण्याऐवजी संस्थेच्या पाळण्यात टाका
'ज्यांना बाळ नको आहे त्यांनी...' बालकांना बेवारस सोडणाऱ्यांना संस्थेचं आवाहन
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज परिसरात एका उसाच्या शेतात ज्येष्ठ महिलेला एक नवजात बाळ बेवारस आढळले. त्याच्या काहीच दिवसांपूर्वी याच परिसरात एका बाळाला कुणीतरी झुडपात टाकून दिले होते मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमुळे त्या बाळाचे प्राण वाचले. दोनच दिवसांपूर्वी अंबड येथे अशाच एका बाळाला कुणीतरी सोडून गेले. थंडीने त्याचा मृत्यू झाला. या घटना संवेदनशील मनाला बोचणाऱ्या आहेत.

पण, जर बाळ नको असेल तर पालक कायदेशीर प्रक्रिया करून त्या बाळाला पुनर्वसन करणाऱ्या संस्थेपर्यंत सुखरूप पोचवू शकतात किंवा संस्थेने त्यांच्या कार्यालयाबाहेर ठेवलेल्या पाळण्यात त्यांना गुप्तपणे सुरक्षित ठेवू शकतात. पुढे ज्यांना मुल नाही असे पालक त्यांना दत्तक घेतात आणि बाळाचे भविष्य सुरक्षित होते.

ता. १४ ते २१ नोव्हेंबर हा सप्ताह ‘दत्तक जाणीव जनजागृती’ सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यावर्षी मात्र संपूर्ण नोव्हेंबर महिना दत्तक जाणीव जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, दत्तक जाणीव जागृती सप्ताहात दत्तक प्रणालीची कायदेशीर प्रकिया आणि मूल दत्तक घेतलेले पालक, स्टेकहोल्डर्स यांना मार्गदर्शन करण्याचे उपक्रम सुरू आहेत. निराधार बालकांचे कायदेशीर दत्तक विधानांद्वारे पुनर्वसन करण्याचे कार्य करणाऱ्या सोसायटी फॉर अ‍ॅडॉप्शन नॉलेज अवेअरनेस अ‍ॅण्ड रिसोर्स संस्था ‘साकार’ने यात पुढाकार घेतला. ‘साकार’ने १ नोव्हेंबरपासूनच सार्वजनिक ठिकाणी माहितीपत्रक लावण्यास सुरुवात केली.

यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बजाज हॉस्पिटल, बसस्थानक, रेल्वेस्थानक, जिल्हा परिषदेचा परिसर, फुलंब्री, सिल्लोड आदी तालुक्यांतील गावांमध्ये माहिती देण्यात आली आणि पोस्टर्स लावण्यात आले. साकारमध्ये असलेल्या पाच मुलींना पल्लवांकुर नर्सरी आणि स्नेहसावली सेंटर दाखवण्यात आले; तसेच साकारच्या आयांना आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय साकारने छोट्या हॉस्पिटलला भेटी दिल्या.

'ज्यांना बाळ नको आहे त्यांनी...' बालकांना बेवारस सोडणाऱ्यांना संस्थेचं आवाहन
Sambhajinagar: तरुण पिढी नशेच्या आहारी ! नशा करण्यापासून थांबवलं म्हणून २० वर्षीय लेकानं बापावर उचलला हात

बाळ नको असेल तर...

अनैतिक संबंधातून जन्मलेले किंवा इतर काही कारणांमुळे रस्त्यावर बाळ सोडून दिल्याचा घटना घडतात. यात बाळाची वाचण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अशा पालकांनी बाळ नको असेल तर ते रस्त्यावर सोडून देण्याऐवजी शहरातील अजमेरा कॉम्प्लेक्स, प्लॉट न. १७७, ज्योतीनगर येथील साकार संस्थेच्या पाळण्यात बाळाला टाकावे. ०२४०-२३४७०९९ आणि ९६७३१०१७६० या क्रमांकावर संपर्क साधावा.

आर्थिक व्यवहाराला स्थान नाही

भारतात दत्तक विधान प्रक्रिया ही बालकांचे न्याय हक्क संरक्षण कायदा २००५ ने नियमित केली आहे. त्या कायद्याबाहेर जाऊन दत्तक देणे किंवा दत्तक घेणे, आर्थिक व्यवहार करून गैरकायदेशीर मार्गाने मुलांची देवाणघेवाण करणे किंवा तशा आशयाची जाहिरात करणे कायद्याने गुन्हा आहे.(Latest Marathi News)

'ज्यांना बाळ नको आहे त्यांनी...' बालकांना बेवारस सोडणाऱ्यांना संस्थेचं आवाहन
Sambhajinagar: तरुण पिढी नशेच्या आहारी ! नशा करण्यापासून थांबवलं म्हणून २० वर्षीय लेकानं बापावर उचलला हात

कोणत्याही कारणाने अनाथ झालेले मुल किंवा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलाला सांभाळणे शक्य नसेल तर त्या बाळाला त्या-त्या जिल्ह्यातील बाल कल्याण समितीपुढे सादर करावे लागते. समिती त्या मुलाला बालगृह किंवा दत्तक विधान संस्थेत पाठवते. जिल्हा बाल संरक्षण कक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची आहे. सर्व दत्तक प्रकरणातील कागदपत्रांची पूर्तता जिल्हा बाल संरक्षण अधिकारी करतात.

दत्तक इच्छुक पालकांना ‘कारा पोर्टलवर’ (Central Adoption Regulation Agency) नोंदणी करावी लागते. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर माहिती अपलोड केली जाते आणि ते मूल दत्तक देण्यास पात्र ठरते. मग देशभरातील दत्तक घेण्यास पात्र पालक त्या मुलाला पाहू शकतात. काराची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी मान्यताप्राप्त संस्थांनाच मूल दत्तक देता येतात. (Latest Marathi News)

'ज्यांना बाळ नको आहे त्यांनी...' बालकांना बेवारस सोडणाऱ्यांना संस्थेचं आवाहन
माझ्याकडे 27 फोटो अन् 5 व्हिडिओ; भाजपचं दुकान बंद पाडण्याची आमच्यात ताकद; संजय राऊतांचा निशाणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.