Balasaheb Thorat : ''देशाचे पंतप्रधान गांधींसमोर नतमस्तक होतात, पण...'' बाळासाहेब थोरात थेट बोलले

Balasaheb Thorat
Balasaheb Thoratesakal
Updated on

मुंबईः शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राज्यात संताप व्यक्त होत आहे. त्यातच आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडेंचा समाचार घेतला आहे.

बाळासाहेब थोरात बोलतांना म्हणाले की, संभाजी भिडे यांचं नाव मनोहर आहे असं सांगितलं जातं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बाबतीत घाणेरडं वक्तव्य आपण ऐकलं आहे. देशाने निषेध करावा इतका मोठा गुन्हा त्यांनी केला असून देशाचे पंतप्रधान गांधींसमोर विनम्र झालेले दिसतात अन् इकडे हे घाणेरडं विधान करतात.

Balasaheb Thorat
12 MLC Maharashtra Case : राज्यपाल नियुक्त आमदारांचं प्रकरण पुन्हा हायकोर्टात; उद्या होणार सुनावणी

थोरात पुढे म्हणाले, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. हा गुन्हा माफ करण्यासारखा नाही. या गुन्हाबद्दल त्या इसमाला अटक केली पाहिजे.

लोकसभा सर्व्हेबद्दल बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, मला असं वाटतं की, आघाडीच्या खूप जास्त जागा निवडून येतील. आघाडी म्हणून ज्यावेळी आम्ही उतरत आहोत, त्यावेळी लोक आमच्याबरोबर असतात. आश्चर्यकारक अशा जागा आम्हाला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Balasaheb Thorat
Uddhav Thackeray News: "दिल्लीला कसं पाणी पाजू शकू हे आपण शिकायला हवं"

प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानावर बोलतांना थोरात म्हणाले, या देशात काय चाललंय हाच प्रश्न आहे. एक आमदार एका महिलेबद्दल असं बोलतो हे निंदनीय आहे.

संभाजी भिडेंनी काय म्हटलं होतं?

अमरावतीच्या बडनेर इथं झालेल्या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडेंनी महात्मा गांधींचे वडील करमचंद गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. करमचंद गांधी हे मोहनदास अर्थात गांधीजींचे खरे वडील नसून ते एका मुस्लीम जमीनदाराचे पुत्र होते, असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं.

इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकानं केल्याचा दावादेखील भिडेंनी केला होता. दरम्यान, या विधानामुळं मोठं वादंग निर्माण झालं आहे. काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. भिडेंविरोधात अमरावतीमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.