Sambhaji Bhide : ''15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही'' संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान; आता भगवा झेंडा घेऊन...

Sambhaji Bhide
Sambhaji Bhidesakal
Updated on

मुंबईः वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे यांनी एक विधान करुन पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलं आहे. आता त्यांनी थेट राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्यदिनाबद्दल भाष्य केलं आहे.

१५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, असं म्हणत त्यांनी राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजावरही भाष्य केलं आहे. अनेकांनी प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवलं, वंदे मातरम् म्हणत हे स्वातंत्र्य मिळालं असल्याचं भिडे म्हणाले.

Sambhaji Bhide
ST Bank Election: विजयानंतर सदावर्ते भान विसरले; नथुरामचा फोटो नाचवत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

काय म्हणाले संभाजी भिडे?

15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही, या दिवशी फाळणी झाली होती. ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं.. वंदे मातरमत म्हटलं ते व्यर्थ नाही.

आता ठाम निर्धार करायचा. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य, हे हांडगं स्वातंत्र्य असेल ते पत्करलं पाहिजे. यावर्षीपासून ९ च्या ठोक्याला भगवा झेंडा घ्यावा. तिरंगाही घ्यावा छोटासा. दखलपात्र म्हणून.

Sambhaji Bhide
Prakash Ambedkar on Aurangzeb : औरंगजेबाच्या कबरीवर फुलं चढवली म्हणून होणारी दंगल थांबली; आंबेडकरांनी दिलं स्पष्टीकरण

असं म्हणून संभाजी भिडे यांनी तिरंगा आणि भगवा ध्वज याबाबत वाद निर्माण होईल, असं विधान केलं आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्य दिनाबद्दल भिडेंचं विधान चर्चेत आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.