Tushar Gandhi : संभाजी भिडेंविरोधात गांधीजींचे पणतू उतरले मैदानात, म्हणाले...

sambhaji bhide
sambhaji bhide
Updated on

Tushar Gandhi : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नुकतेच अमरावती येथे भाषण केला. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यावर आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी ते म्हणाले कि, माझ्यासाठी हे वैयक्तिक दु:ख नाही. पण, हा माणूस एवढे निर्लज्जपणे असे भाष्य करतो आणि समोर बसलेली जनता त्यावर हसते. एका महिलेबद्दल जाहीर कार्यक्रमात घृणास्पद वक्तव्ये केली जातात. तरीही महिला याविरोधात आवाज उठवत नाही. पुरोगामी महाराष्ट्र नुसता बसून आहे, हे अधिक चिंताजनक आहे, असे तुषार गांधी म्हणाले.

sambhaji bhide
Shivsena Shinde Group : शिवसेना शिंदे गटाचा जळगाव लोकसभेसाठी आग्रह : नीलेश पाटील

याचबरोबर ते असेही म्हणाले कि, संभाजी भिडेंचे वक्तव्य ही माझ्या वैयक्तिक दु:खाची गोष्ट नाही. आम्ही आमचे दु:ख जिरवू शकतो. पण, त्यांनी महिलांचा घोर अपमान केला आहे. तरीही महिला का गप्प बसून आहेत. पुरोगामी महाराष्ट्र हे का सहन करतोय, याची आम्हाला चिंता आहे.

तुषार गांधी म्हणाले, संभाजी भिडेंचे वक्तव्य एकाही महिलेला स्वत:चा अपमान वाटला नाही का? या राज्याच्या मानसिकतेची विकृतता कुठपर्यंत गेली आहे, याचे हे उदाहरण आहे. आपला समाज इतका विकृत कसा झाला की विचारांचा द्वेष विचारांनी न करता त्या विचाराच्या व्यक्तीच्या आई-वडिलांबाबत तुम्ही अपमानजनक बोलता.

sambhaji bhide
Sambhaji Bhide on Mahatma Gandhi : महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त विधान भोवलं! संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल

तुषार गांधी म्हणाले, राष्ट्रपित्याबद्दल, त्याच्या आईबद्दल त्यापेक्षाही महत्त्वाचे एका महिलेबद्दल घृणास्पद वक्तव्ये करूनही यावर राज्याचे मुख्यमंत्री कारवाई करत नाही. चौकशी करून योग्य ती कारवाई करू, एवढेच ते बोलतात. मात्र, ती योग्य कारवाई कधी करणार?, असा जाब त्यांना जनता का विचारत नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.