अल्टिमेटम संपला, रायगडावरुन संभाजीराजेंनी दिली आंदोलनाची हाक

sambhaji raje bhosale
sambhaji raje bhosaleesakal
Updated on
Summary

संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje ) यांनी मराठा आरक्षणप्रकरणी (maratha reservation) दिलेला अल्टिमेटम संपला असून त्यांनी रायगडावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई- संभाजीराजे छत्रपती (sambhaji raje ) यांनी मराठा आरक्षणप्रकरणी (maratha reservation) दिलेला अल्टिमेटम संपला असून त्यांनी रायगडावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजेंकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 16 जूनपासून मराठा समाजाचा पहिला मोर्चा काढण्यात येईल. शाहू महाराजांनी सर्वात आधी आरक्षण दिलं होतं. त्यामुळे शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून आंदोलनाला सुरुवात होईल, असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. मागण्या न मान्य झाल्यास मुंबई ते पुणे लाँग मार्च काढण्याचा इशारा संभाजीराजेंनी ठाकरे सरकारला दिला आहे. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. (sambhaji raje on maratha reservation warning to thackeray government)

संभाजीराजे छत्रपती यांनी आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावरुन जनतेशी संवाद साधला. ते मराठा आरक्षणप्रकरणी भूमिका स्पष्ट करणार असल्याने त्यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होते. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणप्रकरणी 'आर या पार'ची तयारी केली आहे. काहीही झालं तरी चालेल, पण मराठा समाजाला आरक्षणं मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय होऊ देणार नाही. आजपर्यंत जे सहन केलं ते यापुढे सहन करणार नाही. इतर समाजांना न्याय मिळतो, मग मराठा समाजाला न्याय का नाही? असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे.

sambhaji raje bhosale
16 जूनपासून मराठा समाजाचा पहिला मोर्चा- संभाजीराजे

शिवभक्तांना अडवू नका, मराठा समाजाला अडवू नका. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. राजकारणाची आम्हाला देणंघेणं नाही, आरक्षण कसं मिळेय याचा पर्याय सांगा. सकल मराठा समाजाने सरकारला तीन पर्याय दिले होते. सरकारने यावर काय निर्णय घेतलाय? कोण चूकं कोण बरोबर याच्याशी घेणदेणं नाही. आधीचं आणि आताचं सरकार एकमेकांकडे बोट दाखवतंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विनाकारण भांडण सुरु आहे. राजकारण सोडा, मराठा समाजाला न्याय द्या असं संभाजीराजे म्हणाले.

sambhaji raje bhosale
दुसरी लाट ओसरतीय! देशात दिवसभरात 1 लाख 14 हजार रुग्ण

दिशा देणं हे छत्रपतींचं काम, दिशा भरकटवणं माझं काम नाही. कोणालाही दिशाहीन करणं आमच्या रक्तात नाही. ज्या समाजाने दिशा दिली, त्याच मराठा समाजावार अन्याय होतोय, अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली. शिवराय प्रत्येकाच्या मनमानात, शिवराज्याभिषेक घराघरात आहे. किल्ले रायगडाचं योग्यरित्या जतन व्हावं, असं ते म्हणाले. दरम्यान, संभाजीराजेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()