Maratha Reservation: मराठा आरक्षणासंबधी दिल्लीत हालचालींना वेग, संभाजीराजे छत्रपती यांचं सर्व खासदारांना तातडीचं पत्र

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात हालचालींना वेग आलेला असतानाच संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी पुढचा विचार करत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal
Updated on

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात हालचालींना वेग आलेला असतानाच संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी पुढचा विचार करत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांनी एकत्र यावं, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी एकत्रित यावं, असं आवाहन करत संभाजीराजेंनी खासदारांना पत्र लिहलं आहे. ते या सर्व खासदारांची लवकरच बैठक बोलावणार आहेत. ही बैठक दिल्लीत होणार असून संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यातील खासदारांनी उचलून धरावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. तर राज्यात ठिकठिकाणी मराठा संघटनांच्यावतीने उपोषण आणि आंदोलने करण्यात आली. मनोज जरांगे यांच्याकडून राज्य सरकारला अल्टिमेटमही देण्यात आलेले आहे. मराठा आरक्षणासाठी आता संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी खासदारांची बैठक आजोजित केली आहे. या बैठकीमध्ये काय चर्चा होणार कोणता निर्णय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संभाजी राजे यांनी खासदारांना लिहिलेलं पत्र

प्रति, मा. सर्व लोकसभा, राज्यसभा खासदार, महाराष्ट्र राज्य

विषय : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील लोकसभा व राज्यसभा खासदारांची दिल्ली येथे एकत्रित बैठकीबाबत…

महोदय,

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. यासाठी अनेक भव्य मोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली आहे. काही युवकांनी यासाठी आत्महत्या सारखा टोकाचा मार्ग निवडला. समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरीही मराठा समाजाने आपली मागणी अतिशय शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने पुढे आणलेली आहे.

मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देवून २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने तर २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदेशीर पातळीवर हे आरक्षण टिकले नाही.

मी स्वतः २००७ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत काही आंदोलने स्वतः देखील केली आहे.

राज्यसभा सदस्य असताना सभागृहात देखील हा विषय सविस्तर पणे मांडला होता. तसेच संसद परिसरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन ही केले होते.

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाचे लाखो युवक हे देखील आंदोलनात सहभाग घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उचलणे आवश्यक आहे.

या विषयी लवकरच नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदारांनी एकत्रित मराठा आरक्षण मिळवण्याबाबत ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीचे सविस्तर निमंत्रण मी लवकरच आपणास पाठवेल.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत आणि समाजाला न्याय मिळावा हि विनंती.

संभाजीराजे छत्रपती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.