जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी IRSची नोकरी मिळवली; मलिकांचा गंभीर आरोप

nawab malik
nawab malikesakal
Updated on

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan khan drug case) पंच प्रभाकर साईलने (prabhakar sail) केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. प्रभाकर साईलने दिलेल्या मुलाखतीमुळे समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्या विश्वासहर्तेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. समीर वानखडे यांची NCB कडून विभागीय चौकशी होणार आहे. दुसरीकडे या समीर वानखेडेंवर याआधीच आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर आता आणखी एक आरोप केला आहे.

nawab malik
२५ कोटी डीलचा आरोप, NCB करणार समीर वानखेडेंची चौकशी

त्यांनी म्हटलंय की, जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी आयएसआरची नोकरी मिळवली आहे. खोटा दाखला काढून वानखेडेंनी एका मागासवर्गीय व्यक्तीची संधी हिरावली आहे. मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर याआधीच भरपूर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांनी आता थेट त्यांच्या या नोकरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

नवाब मलिकांनी म्हटलंय की, मी हेतुपुरस्सर आरोप करतोय, असं भाजपकडून वर्तवण्यात आलं. जावयावर कारवाई केल्यामुळे मी सुडाने आरोप करतोय, असं सांगण्यात आलं मात्र, आता त्यांच्याबाबतचं सत्य आपोआपच बाहेर येतंय. आणखी सत्य बाहेर येणं बाकी आहे.

nawab malik
अ‍ॅमेझॉनवरुन मागवला 70 हजाराचा iPhone; मिळाला साबण आणि पाच रुपयांचा कॉईन

पुढे ते म्हणाले की, मी त्यांच्या जन्माचा दाखला प्रसिद्ध केला आहे. दावूद वानखेडेंनी धर्मांतर केल्यावर हा जन्मदाखला काढण्यात आला. त्यावर खाडाखोड करण्यात आली. इथूनच त्यांची बोगसगिरी सुरु झाली. हळूहळू मी सगळी बोगसगिरी बाहेर काढेन. त्यांचा हा काळा अध्याय मी जनतेसमोर आणणार आहे. त्यांच्या पत्नीचा फोटो मी नाही, लोकांनीच पुढे आणला आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. नोकरीसाठी त्यांनी बोगस दाखला काढून ही नोकरी मिळवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()