बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. समृद्धी द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपुरहून पुण्याला जात होती. मात्र वाटेत भीषण अपघात झाला. बसमध्येच २५ जण जळून राख झाले. या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवारची सकाळ महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. बसमध्ये एकूण 33 लोक होते. यापैकी 3 निष्पापांसह २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. बसला लागलेल्या आगीमुळे कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही आणि क्षणार्धात सर्व काही संपले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दरम्यान या प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी आरोपी शेख दानीश यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
शेख दानीश शेख इसराईल हा विदर्भ ट्रायव्हल्स चा चालक होता. तसेच 279, 304, 337 व 427 आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.