Gram Panchayat Election Result : जयदत्त क्षीरसागरांच्या होमग्राउंडवर पुतण्याचा दणदणीत विजय!

जयदत्त क्षीरसागर यांचं होमग्राउंड असणाऱ्या राजुरीत आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झालाय.
Sandeep Kshirsagar
Sandeep Kshirsagaresakal
Updated on
Summary

जयदत्त क्षीरसागर यांचं होमग्राउंड असणाऱ्या राजुरीत आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झालाय.

बीड : राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

नवगण राजुरी म्हणजे, एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र. दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यानंतर गावच्या व सर्कलच्या राजकारणाची सुत्रं त्यांचे पुत्र रवींद्र क्षीरसागर यांच्याकडं राहिली. पुढं काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यातील राजकीय ठिणगीनंतर तिसऱ्यांदा राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच बाजूनं कल दिलाय.

ग्रामपंचायत निवडणूक निकालात मंगळवारी संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविला. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांची राजकीय कारकिर्द देखील नवगण राजुरीच्या (ता. बीड) सरपंच म्हणूनच सुरु झाली.

Sandeep Kshirsagar
Gram Panchayat Election Result : सांगलीत राष्ट्रवादीला दणका; आमदार गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री सरपंचपदी विजय!

दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचे बीड तालुक्यातील नवगण राजुरी (Rajuri Gram Panchayat Election Result) हे बाजारपेठेचे व जिल्हा परिषद सर्कलचं गाव. त्यामुळं गावाला मोठे राजकीय महत्व आहे. गावच्या ग्रामपंचायतीवर बहुदा क्षीरसागरांचंच प्रभूत्व राहिलेलं आहे. दिवंगत केशरबाई क्षीरसागर देखील येथील सरपंच राहिल्या. त्यांच्यानंतर ग्रामपंचायतीची सत्ता कायम त्यांचं चिरंजीव रविंद्र क्षीरसागर यांच्या अधिपत्याखाली राहिली. त्यांच्यासह खुद्द त्यांच्या दिवंगत पत्नी व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांनी देखील येथील सरपंचपद सांभाळलं. क्षीरसागर एकत्र असतानाही गावातील राजकीय विरोधकांनी त्यांना आव्हान दिलं आणि काही प्रमाणात राजकीय यश देखील मिळविलं. २०१६ पासून क्षीरसागरांत राजकीय दरी निर्माण झाली.

यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत गावातील मताधिक्य संदीप क्षीरसागर यांच्याच पारड्यात पडलं. नंतर ग्रामपंचायत निवडणुकीत देखील संदीप क्षीरसागर गटाच्याच पॅनलनं बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत देखील तत्कालिन मंत्री व शिवसेनेचे बीड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनाच अधिक मतं मिळाली.

Sandeep Kshirsagar
Gram Panchayat Election Result : साताऱ्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य; शंभूराजे देसाईंना मोठा धक्का

आता देखील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीच्या विरोधात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पॅनल समोरासमोर होते. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील स्वर्गीय काकू - नाना रेखाताई विचार राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीच्या मंजूषा बनकर यांच्यासह इतर सदस्यपदाचे उमेदवार विजयी झाले. तर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून नवगण परिवर्तन विकास आघाडीनं अंबिका लगड या सरपंचपदाच्या उमेदवारासह सदस्यांचा पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.