Sangli Lok Sabha Election 2024 : करायला गेले एक अन्...; संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यात नेमकं काय घडलं?

Sangli Lok Sabha Election 2024 : काल आणि आज राऊत जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
Sangli Lok Sabha Election 2024
Sangli Lok Sabha Election 2024
Updated on

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जो वाद सुरू झाला, तो मिटावा आणि महाविकास आघाडीअंतर्गत सुसंवाद निर्माण व्हावा, यासाठी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना सांगली दौऱ्यावर पाठवलं आहे. सुसंवाद दूरच, उलट राऊत यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे आरोपाच्या फैरी झाडत काँग्रेसला पुरते घायाळ केले आहे. उद्याचा दिवस ते पुन्हा सांगलीत असतील. तोपर्यंत ते महाविकास आघाडीचे पुरते भरीत करतात की काय, अशी चर्चा आहे.

दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख खुद्द उद्धव ठाकरेंनी मिरजेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करीत धुरळा उडवून दिला. तेव्हापासून काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. आता हा वाद सोनिया गांधींपर्यंत पोहोचला असून तिकडे, विश्‍वजित व विशाल असताना सांगलीत राऊत यांनी वादाला फोडणी दिली आहे. जिल्ह्यात तूर्त काँग्रेसची मोठी कोंडी झाली आहे. शरद पवार यांनीही, ‘सांगलीची जागा मित्रपक्षांना विश्‍वासात घेऊन जाहीर झालेली नाही,’ असे वक्तव्य पुण्यात केले.

त्यावर मात्र राऊत यांनी थेट बोलणे टाळले. त्याच वेळी ‘भिवंडी’चा निर्णयही एकमताने झालेला नाही, असे सांगत डिवचले. विश्वजित कदम हे भाजपच्या संपर्कात असल्याचा थेट आरोप करताना त्यांनी, ‘विशाल यांचे पायलट असलेल्या कदमांचे विमान गुजरातकडे भरकटणार नाही, याची काळजी घेऊ,’ असे म्हटले. श्री. कदम भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. त्यावर कदम खुलासा करीत असतात. आता राऊतांच्या विधानाने जिल्ह्यातील काँग्रेस नेते संतापले आहेत. त्यांनी रात्री तत्काळ निषेध पत्र काढले. विश्वजित यांनी काँग्रेसी स्वभावाप्रमाणे अत्यंत सौम्य भाषेत निषेध नोंदवला आहे. मात्र आता हा वाद विकोपाला जाताना दिसत आहे.

Sangli Lok Sabha Election 2024
Pune News: पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता, शिप मॅनेजमेंट कंपनीत करत होता काम

काल आणि आज राऊत जिल्ह्यातील अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपवर नाराज असलेल्या विलासराव जगताप, अजितराव घोरपडे या मंडळींच्या भेटीगाठी घेत त्यांनी चुचकारले आहे. ‘राष्ट्रवादी शरद पवार गट आपल्यासमवेत आहे,’ असे तेथे सांगत असले तरी पवार गटांचे कोणीही त्यांच्या दौऱ्यात फिरकलेले नाही. एकूणच, महाविकास आघाडीशिवाय राऊतांचा हा दौरा वैयक्तिक ठरत असून ते एकाकी पडल्याचे चित्र आहे. हे पाहून त्यांनी, ‘बरोबर असो वा नसो, आम्ही एकटे लढू,’ अशा शब्दांत त्यांनी दोन्ही काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे. त्यांच्या ऐन निवडणुकीत ‘आ बैल मुझे मार’ या भूमिकेमुळे आघाडीतील सुसंवाद दूर, वादच चव्हाट्यावर आला आहे.

Sangli Lok Sabha Election 2024
Rohit Sharma : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये 'हा' खेळाडू देतो जास्त शिव्या.... भारतीय कर्णधार रोहितचा मोठा खुलासा

इकडे, काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीतील पक्षश्रेष्‍ठींच्या आदेशाकडे डोळे लावून बसले आहेत, तर राऊत यांनी मात्र काँग्रेस बरोबर नसेल, असे गृहीत धरूनच ‘प्रचाराला लागा,’ असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांचा राजकीय चाचपणी दौरा आघाडीत बिघाडी निर्माण करणारा ठरत आहे. त्याचे आता राज्यस्तरावरही पडसाद उमटत आहेत. सिंधुदुर्गातून नीतेश राणे यांनी राऊतांवर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करीत या वादाच्या आगीत तेल ओतले आहे. एकूणच, जिल्ह्यात राऊत यांनी जिल्ह्यातील थंड वातावरणात राजकीय धुळवड उडवून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.