Sangli Lok Sabha Election : विशाल पाटलांच्या नशिबी ‘लिफाफा’...; सांगलीच्या राजकारणात नेमकं चाललंय काय?

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघातला महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला असला तरी, शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसमधला विस्तव अजूनही शांत झालेला नाही
 Sangli Lok Sabha Election 2024 Vishal Patil Lifafa Election Symbol Chandrahar Patil marathi Politics News
Sangli Lok Sabha Election 2024 Vishal Patil Lifafa Election Symbol Chandrahar Patil marathi Politics News
Updated on

सांगली लोकसभा मतदारसंघातला महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला असला तरी, शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसमधला विस्तव अजूनही शांत झालेला नाही. कारण, सांगलीचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. तरी, सांगली अन् हातकणंगलेत उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आलं. यात राजू शेट्टींची शिट्टी वाजली आहे तर विशाल पाटलांचं इथेही चाललेलं दिसत नाही. कारण, हातासाठी झगडणाऱ्या विशाल पाटलांच्या नशिबी ‘लिफाफा’ आला आहे.

त्याचं झालं असं की, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आज अपक्ष उमेदवारांसाठी चिन्हवाटप झालं. यावेळी विशाल पाटील एकटेच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचलेले दिसले. तरी, विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक चिन्हासाठी शिट्टी, टेबल आणि गॅस सिलेंडर हे तीन पर्याय सुचवले होते. पण, प्रशासनाकडून त्यांना लिफाफा हे वेगळंच निवडणूक चिन्ह मिळालं. तरी, विशाल पाटलांना चिन्ह मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

 Sangli Lok Sabha Election 2024 Vishal Patil Lifafa Election Symbol Chandrahar Patil marathi Politics News
Wayanad: राहुल गांधींच्या वायनाडमध्ये माओवाद्यांचा धुमाकूळ, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे लोकांना आवाहन

तर तिकडे विशाल पाटलांना हवं असलेलं शिट्टी हे निवडणूक चिन्ह मात्र हातकणंगलेत राजू शेट्टींना मिळालंय. खरंतर मागील लोकसभा निवडणूक म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही राजू शेट्टी शिट्टी या निवडणूक चिन्हावरच लढले होते. पण त्यावेळी त्यांचा पराभव झालेला. पण, २००९ आणि २०१४ साली हातकणंगलेतून अनुक्रम निवेदिता माने आणि कलाप्पा आवाडेंचा पराभव करुन ते सलग दोन वेळा संसदेत गेले होते. आता राजू शेट्टींबद्दल सांगण्याचं कारण म्हणजे, २०१९ साली याच राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाकडून विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते अन् त्यांचा भाजप उमेदवार संजयकाका पाटलांनी पराभव केला होता. अन् आताही विशाल पाटील पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. पण, यंदाही त्यांना काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळालेली नाही. २०१९ ला सांगलीची जागा स्वाभिमानीकडे तर आता, जागावाटपात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली. अन् तिथून त्यांनी चंद्रहार पाटलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

त्यामुळे ठाकरेंकडे जागा जाऊनही त्यांनी यंदा विशाल पाटलांऐवजी नवा उमेदवार दिला. तो म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. खरंतर चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी, उमेदवारी अर्ज भरतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. तर, चंद्रहार पाटलांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी काँग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित होते. त्यामुळे आता लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं आणि जागावाटपात सांगलीची जागा सुटल्यानं विशाल पाटील अन् काँग्रेस नेते नाराज झालेले दिसले. अशातच ठाकरेंनी चंद्रहार पाटलांचं नाव घोषित केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी दोन-तीनदा दिल्लीवारी केली पण तरी, त्यांच्या पदरी निराशाच आलेली दिसली.

 Sangli Lok Sabha Election 2024 Vishal Patil Lifafa Election Symbol Chandrahar Patil marathi Politics News
Heeramandi: संजय लीला भन्साळींचं व्हिजन, अन् सात महिने 700 कारागिरांची मेहनत.. असा तयार झाला हिरामंडीचा भव्य सेट

तर तिकडे संजय राऊतांनीही हिंदकेसरीनं गल्लीतली कुस्ती खेळू नये म्हणत काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली. सांगलीच्या एका जागेसाठी राहुल गांधींच्या पारड्यातला एक खासदार कमी करायचाय? असा सवाल उपस्थित करत राऊतांनी काँग्रेसवर दबाव कायम ठेवला. तरी, काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी विशाल पाटलांनी मोठं शक्तिप्रदर्शनही केलं. अन् आज त्यांना निवडणूक आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.

त्यामुळे, आता विशाल पाटील सांगलीतून लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याचं दिसतंय. तरी, काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटलांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. तर तिकडे विशाल पाटील अन् डॉ. विश्वजीत कदम सांगलीच्या जागेवर आग्रही आहेत. त्यामुळे सांगलीचा तिढा सोडवण्यात अजूनही काँग्रेस पक्षाला यश आलेलं दिसत नाही. त्यामुळे विशाल पाटलांनी बंडखोरी कायम ठेवल्यास त्यांची पक्षातून हकालपट्टी होणार का? हे पाहणं महत्वाचं असेल. तरी, लिफाफा चिन्हावर विशाल पाटील येत्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.