MNS : राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा झटका; 'त्या' गुन्ह्यातून मुक्तता करण्यास नकार

MNS : राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा झटका; 'त्या' गुन्ह्यातून मुक्तता करण्यास नकार
Updated on

Raj Thackeray Shirala News Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना शिराळा कोर्टाने मोठा झटका दिला असून, सांगली जिल्ह्यातील शेडगेवाडी फाट्याजवळील आंदोलनातून राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांची मुक्तता करण्याचा अर्ज नामंजूर केला आहे.

MNS : राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा झटका; 'त्या' गुन्ह्यातून मुक्तता करण्यास नकार
Global Hunger Index : 'देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न', केंद्राचे तीव्र शब्दांत प्रत्युत्तर

या प्रकरणावरील सुनावणीसाठी तारखेला कोर्टात हजर न राहिल्याने यापूर्वी ठाकरेंविरोधात वॉरंट सुद्धा काढण्यात आलं होतं. मात्र नंतर हे वॉरंट रद्द करण्यात आलं. त्यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलांतर्फे राज यांचे नाव संबधित गुन्ह्यातून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी शिराळा न्यायालयात अर्जदेखील सादर करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला आहे.

MNS : राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा झटका; 'त्या' गुन्ह्यातून मुक्तता करण्यास नकार
India : परदेशात बसलेल्या गुन्हेगारांचे काउंटडाऊन सुरू, दिल्लीत होणार Interpol ची महासभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिरीष पारकर यांच्यावतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा घडतेवेळी ते दोघेही उपस्थित नव्हते, तर ते अन्य गुन्ह्याच्याकामी अटकेत होते. त्यांच्याविरुध्द केस चालविण्याइतपत पुरावा नाही. त्यामुळे त्यांची सदर गुन्ह्यातून मुक्तता करण्यात यावी असा अर्ज केला होता.

नेमकं प्रकरण काय?

रेल्वे भरतीमध्ये २००८ मध्ये 'स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या,' या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात कल्याण कोर्टाच्या आदेशाने राज ठाकरेंवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला होता. त्यावेळ जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडलं होतं.या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिरीष पारकर, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत सहित दहा जणांच्या वर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांतता भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे या बाबत गुन्हा दाखल करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.