मुंबई - एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिंदे यांच्या बंडात विदर्भातील नेते संजय राठोड देखील सामील होते. शिवाय राठोड यांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपदही देण्यात आले. आता राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनिती आखली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज माजी राज्यमंत्री आणि पुर्वाश्रमीचे भाजपनेते संजय देशमुख प्रवेश करणार आहेत. संजय देशमुख यांचा शिवसेना प्रवेश संजय राठोड यांना शह देणारा ठरणार आहे. संजय देशमुख कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले आहेत.
संजय देशमुख म्हणाले की, मी शिवसेनेतच होतो. जिल्हा प्रमुख होतो. आज शिवसेनेवर जी परिस्थिती आली आहे, सर्वकाही मिळूनही अनेकजण शिवसेना सोडून गेले. उद्धवसाहेब आणि बाळासाहेब यांच्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचंही देशमुख यांनी नमूद केलं.
मागच्या विधानसभा निवडणुकीत मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी मला ७५ हजार मते मिळाली होती. आजची राजकीय परिस्थिती पाहता, शिवसैनिक म्हणून मातोश्रीकडे धावून जायला हवं. कार्यकर्त्यांचा देखील आग्रह होताच, असंही देशमुख यांनी म्हटलं. एकूणच राठोड यांना शह देण्यासाठी संजय देशमुख यांना उद्धव ठाकरे आगामी काळात रसद पुरवणार हे स्पष्टच आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.