मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) हे सध्या बेल्जियममध्ये आहेत. असा दावा काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. यासोबतच निरुपम यांनी परमबीर सिंग यांना पळून जाण्यास कोणी मदत केली? असा सवालही केला आहे. परमबीर सिंग गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजने (ANI) परमबीर सिंग यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले आहे, मात्र ते अद्याप हजर झाले नाहीत.
परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधात देखील आरोप झाले. त्यावरून ठाणे कोर्टाने देखील परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जाहीर केले होते.
संजय निरुपम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, हे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आहेत. मंत्र्यावर खंडणी वसूलीचा आरोप होता. तो स्वत: पाच गुन्ह्यांमध्ये वॉण्टेड आहे. ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता ते बेल्जियममध्ये आहेत असे समजते. ते बेल्जियमला गेले कसे? त्याला सेफ पॅसेज कोणी दिला? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना आणू शकत नाहीत?"
परमबीर सिंग हे प्रकृतीच्या कारणास्तव मे महिन्यापासून रजेवर आहेत. परमबीर सिंग यांना त्यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी अनेक पत्रे पाठवण्यात आली होती आणि त्यांचा ठावठिकाणाविषयी विचारणा करण्यात आली होती, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या महिन्यात गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी अखिल भारतीय सेवा (आचार) नियमांच्या तरतुदींचा विचार करत असल्याचे सांगितले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.