संजय राठोड यांनी मौन सोडलं; चित्रा वाघ यांना अप्रत्यक्ष इशारा देत म्हणाले...

आरोपाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे म्हणून राजीनामा दिला होता
Sanjay Rathod Latest News
Sanjay Rathod Latest NewsSanjay Rathod Latest News
Updated on

Sanjay Rathod Latest News मुंबई : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई केली होती. यामुळे त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता शिंदे सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधक व भाजपच्या चित्रा वाघ यांच्याकडून हल्ला करण्यात येत आहे. या आरोपांवर अखेर संजय राठोड यांनी मौन सोडले. त्यांनी अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना इशारा दिला आहे.

परळीतील युवती पूजा चव्हाण हिचा ७ फेब्रुवारी रोजी २०२१ रोजी पुणे येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या ऑडिओ सीडी व्हायरल झाली होती. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमागे तत्कालीन सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचा हात असल्याचे पुढे आले होते. यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती.

Sanjay Rathod Latest News
Omicron: भारतातील नवा Sub Variant अधिक संसर्गजन्य

यामुळे ते काही दिवस बेपत्ताही होते. या प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. तेव्हापासून या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू होती. चौकशीअंती पोलिसांनी संजय राठोड यांना या प्रकरणात क्लिन चिट दिली आहे. आता ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून चित्रा वाघ (Chitra Wagh) त्यांच्यावर पुन्हा हल्‍ला करीत आहे.

आरोपीला कसे मंत्री केले, असा प्रश्न त्यांनी केला. तसेच संजय राऊत यांच्याविरुद्ध लढा सुरूच राहील असेही त्या म्हणाल्या. तसेच विरोधकांनीही त्यांच्यावर हल्ले केले. आता या सर्वांना संजय राठोड यांनी उत्तर दिले आहे. एका घटनेवरून माझ्यावर आरोप केले जात आहे. त्या प्रकरणात पोलिसांनी मला क्लिन चिट दिली आहे, असे संजय राठोड (Sanjay Rathod) म्हणाले.

Sanjay Rathod Latest News
Congress President Election : २१ ऑगस्टपासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक!

नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला होता

माझ्यावर आरोप झालेल्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा दिला होता. १५ महिने मी मानसिक तणावात होतो. माझे कुटुंब तणावात होते. अशा प्रसंगातून कोणीही जाऊ नये. नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला होता. आता क्लिन चिट मिळाल्यानंरही आरोप होत आहे, असेही संजय राठोड म्हणाले..

कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल

लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, चित्रा वाघ माझ्यावर सातत्याने हल्ला करीत आहे. चित्रा वाघ यांना या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मिळाली नसावी. त्यांना ती पाठवण्याची व्यवस्था करतो. आतापर्यंत शांत होते. असेच सुरू राहिले तर कायदेशीर मार्ग अवलंबावा लागेल. नोटीसही द्यावी लागले, असा अप्रत्यक्ष इशारा संजय राठोड यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कागदपत्रांची तपासणी केली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली. त्यांना पूजा चव्हाण प्रकरणात माझा कोणताही सहभाग दिसला नाही. तसेच पोलिसांनीही मला क्लिन चिट दिली आहे. हे सर्व तपासल्यानंतर त्यांनी मला मंत्रिमंडळात घेतले आणि मंत्रिपदाची शपथ घेण्यासा सांगितले, असे संजय राठोड पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.