मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राऊतांनी आज पुन्हा ट्विट करत किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. तपास यंत्रणेच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून सोमय्यांना करोडो रुपये मिळाले. ही लूटमार नाही का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
गेल्या २०१३ मध्ये किरीट सोमय्यांनी एका कंपनीवर आऱोप केले होते. त्यानंतर २०१६मध्ये या कंपनीवर ईडीने कारवाई केली. त्यानंतर २०१८-२९ या कालावधीत किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून करोडो रुपये मिळाले. तुम्ही क्रोनोलॉजी समजा, असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे. या प्रकरणी ईडी आणि इओडब्ल्यूकडून चौकशी का केली जात नाही? असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच याप्रकरणी लवकरच तक्रार दाखल करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडीच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून करोडो रुपये कसे काय मिळतात? ही लूटमार आहे की हा काळा पैसा पांढरा करण्याचा घाणेरडा खेळ आहे का? हिशोब तर द्यावाच लागेल, असंही संजय राऊत म्हणाले. याविरोधात तपास यंत्रणा आणि चारीटी कमिशनकडे तक्रार दाखल केली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, संजय राऊतांनी आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी गोळा केलेल्या निधीत घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांवर केला होता. त्यांनी सोमय्यांना अटक देखील होणार होती. त्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला होता. अखेर त्यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला. पण, याप्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यानतंर राऊत टॉयलेट घोटाळ्याचे आरोप सोमय्यांवर केले होते. तसेच हा घोटाळा लवकरच बाहेर आणणार असून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानने हा घोटाळा केल्याचे राऊतांनी म्हटले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.