Sanjay Raut : राष्ट्रभक्त दहशतवादी वाटत असेल तर...; देशमुखांच्या भेटीनंतर राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut  and Anil Deshmukh
Sanjay Raut and Anil Deshmukh
Updated on

मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाकडून जामीन मंजूर केल्यानंतर ते आर्थर जेलमधून बाहेर आले आहेत. एक वर्ष १ महिना आणि २७ दिवस त्यांना तुरुंगात रहावं लागल. देशमुख बाहेर आल्यानंतर पक्षात आनंदाचे वातावरण आहे. त्यातच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी राऊत यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणांवर जोरदार हल्लाबोल केला. (Sanjay Raut news in Marathi)

Sanjay Raut  and Anil Deshmukh
Live Update : नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत 538 कोटी रुपयांचं ड्रग्ज नष्ट

राऊत म्हणाले की, अनिल देशमुख ३० वर्षांपासून सार्वजिक जीवनात आहे. त्यांची संपूर्ण कारकिर्द ही निष्कलंक आहे, हे सर्वांना माहित आहे. त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम केलं. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, दिल्लीतील नेते, झारखंडमधील काही नेते असतील यांच्याबाबत कायद्याचा गैरवापर करण्यात आला. शेवटी कायद्याची लढाई शेवटपर्यंत लढून आम्ही जिंकलो.

राऊत पुढं म्हणाले की, कायदा हा दहशतवाद वाढविण्यास मदत करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी आहे. आमच्यासारखे राष्ट्रभक्त तुम्हाला दहशतवादी वाटत असेल तर संविधानातील अनेक व्याख्या बदलाव्या लागतील. अनिल देशमुख ज्या संकटातून गेले त्या संकटातून मीही गेलेलो आहे. त्यामुळे मी त्यांना खास भेटण्यासाठी आलो.

Sanjay Raut  and Anil Deshmukh
Samruddhi Expressway: अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाचा मोठा निर्णय

आमच्यावर जे प्रसंग आले ते प्रसंग शत्रुवरही येऊ नये. अडीच वर्ष महाराष्ट्रातील सत्ता आमच्याही हातात होती. युपीएच्या काळातही सत्ता जवळून पाहिली. पण शत्रुसोबत आम्ही निर्घुणपणे वागलो नव्हतो, असंही राऊत म्हणाले. न्यायव्यवस्थेत अजुनही रामशास्त्री आहेत, ज्यांच्यामुळे न्यायदेवतेवर विश्वास ठेवता येतो, असंही राऊत यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()