Pulwama Attack: 'पुलवामा हल्ल्यावेळी RDX पोहचलं कसं?' राऊतांनी प्रश्न उपस्थित करत केले गंभीर आरोप

सत्यपाल मलिक यांनी मोदींवर गंभीर आरोप केल्यानंतर पुलवामा हल्ला पुन्हा चर्चेत
Pulwama Attack
Pulwama AttackEsakal
Updated on

2019 च्या निवडणुकीपूर्वी पुलवामामध्ये झालेल्या हल्ला राजकारणासाठी घडवून आणला गेला होता का? राजकारण करण्यासाठी या हत्या करण्यात आल्या का? इतकी कडक सुरक्षा असतांना त्या ठिकाणी आरडीएक्स कसं पोहचलं असे विविध सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान या घटनेवरून मोदी सरकारवर त्या वेळी सुध्दा अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते, पण त्यावेळी कोणी बोललं तर देशद्रोहाचा खटला दाखल केला जाईल अशी भीती दाखवली जायची पण आता मोदी सरकारवरच देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे. पुलवामा हल्ला घडवून आणला का अशी शंका तेव्हाही उपस्थित केली होती असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान सारखा मुद्दा उपस्थित करायचा आणि निवडणुका जिंकायच्या, हल्ला करून निवडणुका जिंकल्या होत्या का? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला केला आहे.

Pulwama Attack
Political News: 'भारत हा हिंदुराष्ट्र...', पोस्ट केली कोणी? हिंदुराष्ट्रच्या ट्विटवरून भाजपमध्ये मतभेद

संजय राऊत यांनी थेट मोदी सरकारच्या कामगिरीवर शंका उपस्थित करत हल्लाबोल करण्यात सुरुवात केली आहे. मोदी सरकारवरच राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी करत हल्लाबोल केला आहे.

2019 च्या निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे दीडशे किलोच्या वरती आरडीएक्सच्या माध्यमातून भारतीय जवानाच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामध्ये चाळीस जवान शाहिद झाले होते. सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था असतांना पुलवामा हल्ला झालाच कसा? इतक्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स पोहचलं कसं? असे विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भारताकडून सर्जिकल स्ट्राईक केला होता. भारताने बदला घेतला असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

Pulwama Attack
Pulwama Attack : "सुरक्षेतल्या त्रुटीची माहिती मी दिली होती पण..."; सत्यपाल मलिक यांचा मोदींवर गंभीर आरोप

सत्यपाल मलिक यांचा मोदींवर गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काश्‍मीरकडे दुर्लक्ष होते आणि येथील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष केल्यानेच नंतर पूलवामा हल्ला झाला, असा सनसनाटी आरोप जम्मू-काश्‍मीरचे अखेरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मोदींना भ्रष्टाचाराबाबत फारसा तिटकाराही नाही, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

जवानांना हवाई मार्गाने नेण्याची ‘सीआरपीएफ’ने केलेली मागणी केंद्रीय गृह मंत्रालयाने फेटाळली होती, जवानांना नेण्याच्या मार्गावरही पुरेशी सुरक्षा तपासणी झाली नव्हती, असा दावा मलिक यांनी केला.

Pulwama Attack
Amol Kolhe: "आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं मग..."! अमोल कोल्हेंचं सूचक वक्तव्य

मलिक म्हणाले,‘‘ विशेष म्हणजे, पुलवामा हल्ल्यानंतर मोदी यांनी कॉर्बेट उद्यानाबाहेरून माझ्याशी संपर्क साधला त्यावेळी मी त्यांना त्रुटींची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी मला याबाबत शांत बसण्यास सांगितले. नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनीही मला हेच सांगितले. सर्व खापर पाकिस्तानवर फोडण्याचा आणि घटनेचा राजकीय फायदा उठविण्याचा यामागील उद्देश असल्याचे मला समजून चुकले.’’

Pulwama Attack
Ajit Pawar: अजित पवारांना मविआमध्ये उपमुख्यमंत्रिपद का दिलं? जयंत पाटील म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.