संजय राऊतांची राणेंचे नाव न घेता खरमरीत टीका, म्हणाले गुन्हेगारांना..

sanjay raut
sanjay rautSakal
Updated on

नाशिक : गुन्हेगारांना इतर राज्यात राश्राजय देण्याचे प्रकार घडतात, अशा शब्दात प्रत्यक्ष नाव न घेता शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फरार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विषयी प्रश्नाला उत्तर दिले. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना फरार असलेल्या गुन्हेगाराची माहीती असूनही ते लपवित असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असे मत मांडले. त्यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना राणे पिता-पुत्रांवर जोरदार हल्ला चढवला.

आज नाशिक येथे प्रेम दशरथ पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या हस्ते त्यांचे स्वागत झाले. भविष्यात महापालिकेतील सगळ्याच पक्षातील नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्र्यांनी माहिती लपवणे चूकीचे

राऊत म्हणाले की, दुसऱ्या राज्यात लपवून ठेवले असेल तर गुन्हेगार पोलिसांना कसे सापडतील. अनेकदा गुन्हेगारांना राजाश्रय मिळतात तेव्हा गुन्हेगार शोधायला पोलिसांना वेळ लागतो. कोणताही गुन्हेगार राज्यातील पोलिस शोधून काढतील. राणे प्रकरणात राजाश्रय मिळतो आहे का? याविषयी मात्र त्यांनी थेट राणे यांचे नाव घेण्याचे टाळले.

राऊत म्हणाले की, नीलेश राणे सापडत नाही. हा विधी न्याय केंद्रीय मंत्री राणे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत पोलिसांना हव्या असलेल्या संशयिताची माहिती आहे असे वक्तव्य केले आहे. गुन्हेगारांची माहिती असूनही पोलिसाना माहिती न देणे हे बेकायदेशीर आहे. केंद्रीय मंत्री जबाबदार नेते आहेत. माजी मुख्यमंत्री होते. पोलिसांपासून महत्वाची माहिती लपविणे चुकीचे आहे. अन्यथा गुन्हेगारांची माहिती पोलिसांपासून लपविण्यावरुन केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

सुधीरभाऊ बरखास्त करुन दाखवाच..

नाव बदलावच लागेल, आम्हाला त्यांचे नाव फार अवडतं. सुधीर, सरकार बरखास्त करता येणार नाही, करुन दाखवा. बहुमतातील 170 आमदारांचा पाठिंबा असलेले सरकार बरखास्त करणं सोपे आहे का, राष्ट्रपती काय तुमच्याकडे गोट्या खेळतात का, राज्यपालांना महाराष्ट्रात येण्या आधीपासून ओळखतो. राज्याच्या राज्यपालांना कोण धमकी देणार, उध्दव ठाकरे यांचा स्वभाव धमकी देण्याचा आहे का, शिवसेनेचे मंत्री धमकी देण्याचे पोकळ प्रकार करीत नाही.

विधानसभेला अध्यक्ष मिळावा अशी आमची इच्छा होती. राज्यपालांनी म्हटले असे करता येणार नाही. आमचे 12 सदस्य आमदार करीत नाही. उलट राज्यपाल कुणाच्या धमकीवरुन हे करीत आहेत हाच प्रश्न आहे असे राऊत यांनी सुनावले.

केंद्रीय यंत्रणेकडून आमचाही छळ

रोहीणी खडसे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी राउत म्हणाले की, एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुना वाद आहे. वीस वर्षापासून वाद आहे. एकत्र बसून प्रश्न सोडवू असे त्यांनी सांगीतले.

केंद्रीय यंत्रणांकडून आमचाही छळ

केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन व राज्यातील भाजप नेत्यांचा वापर करुन महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंत्र्यावर गुन्हे दाखल करुन कसा त्रास दिला जातो. हे आम्ही अनुभवतो आहे. प्रोटोकाॅल बुक माझ्याकडेही आहे. आमदार अनिल गोटे यांनी काही कागदपत्र दिले आहेत. मला ते प्रकरण गंभीर वाटले. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे ही माहीती पाठविणार आहे असे राऊत यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()