खासदार संजय राऊत यांनी आज पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि काश्मीर फाईल्सवरून (Kashmir Files) पुन्हा एकदा भाजपाला (BJP) धारेवर धरलं आहे. सामना अग्रलेखातून त्यांनी चंद्रकात पाटील यांच्यावरही सडकून टीका केली आहे. दरम्यान, खूप आधीपासूनच पाकिस्तानच्या मेहबुबा मुफ्ती (Mehebuba Mufti) आणि भाजपाची खास मैत्रीण आहे. काश्मीर सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी असं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं आहे. ते पाप भाजपाचं आहे. मुफ्ती यांच्या पक्षाला ताकत देण्याच काम भाजपा करत आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
यावेळी ते म्हणाले, काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी असं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं आहे. त्यामुळ हे पाप भाजपाचं आहे. भाजपानं मुफ्ती यांच्या पक्षाला ताकद दिली आहे. त्यामुळं तेच याला जबाबदार आहेत. भाजपाची मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत अगदी सुरुवातापासून खास दोस्ती आहे. मुफ्ती यांचा पक्ष फुटीरतावाद्यांना मदत करणारा आहे, हे माहिती असूनही भाजपाने त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. मुफ्तींचा पक्ष काश्मीरला पाकिस्तानात ओढणार अतिरक्यांना सहानभूती दाखवणारा असूनही भाजपाने सातत्याने त्यांचा पाठपुरावा केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, भाजपाने यांच्याबरोबर सत्ता निर्माण केली त्यावेळी काश्मीरी पंडितांवर हल्ले झाले. मुफ्ती यांनी त्याकाळात लष्काराने मारलेल्या अतिरेक्यांना स्वातंत्र्यसैनिक ठरव्याचा प्रयत्न केला तरीही भाजप त्यांच्योसोबत सत्तेत राहिले. आणि आता हेच भाजपवाले काश्मीर फाईल्स संदर्भात वक्तव्य करत आहेत. भाजपाने सत्तेत येऊन वारंवार अशांना ताकद देण्याचं काम केलं आहे. भाजपा कोणत्याही विचारधारेचा पुरस्कार करत असले तरी शिवसेना मात्र या विचारधारेचा विरोध करत राहणार, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.