मुंबई : ''देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये (Deglur biloli Bypoll Election Result) महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला चांगल्या मतांनी विजय मिळतोय. भाजपकडे तिथे उमेदवारही नव्हता. त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्याला फोडलं आणि तिकडे घेतलं. स्वतःचा उमेदवार घ्या आणि निवडणूक लढवून दाखवा. उपरे आहेत त्यांच्या हातात तलवारी देऊन आमच्यावर वार करू नका. तुमची स्वतःची ताकद आहे की नाही?'' असा सवाल खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपला विचारला आहे. आज ते मुंबईत बोलत होते.
हुकूमशाहीविरोधात लढाई -
''आज दादरा-नगर हवेली मध्ये देखील लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना ऐतिहासिक विजय मिळतोय. मोहन डेलकर आमचे सहकारी होते. ते सातवेळा निवडून आले होते. त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्या आत्महत्येच्या मागे दादरा नगर हवेलीत भाजपने जे प्रशासक बसवले होते ते प्रफुल छेडा पटेल यांची हुकुमशाही कारणीभूत आहे. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात तिथे लढाई केली. तिथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मतदान केलं. आतापर्यंत तिथं एवढा विजय कुणाला मिळाला नव्हता'', असेही संजय राऊत म्हणाले.
...अन् पुन्हा आकड्यांचा खेळ सुरू होईल -
''शिवसेनेचे महाराष्ट्राच्या बाहेर दमदार पाऊल आहे. बरेच वर्ष आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर विजयाची प्रतिक्षा करत होतो, ती संधी इथे मिळाली. दमन, दक्षिण गुजरातमध्ये काम करतोय. आदित्य ठाकरे गोव्यात काम करतात. २२ खासदार असलेला पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आता २३ खासदार झालेत. शिवसेनेला आता राष्ट्रीय पक्ष व्हायचं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशाचं चित्र बदललेलं असेल. एक पक्षीय सरकारचे दिवस २०२४ ला संपतील. पुन्हा एकदा आकड्यांचा काळ सुरू होईल'', असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील राष्ट्रपती आहे का?-
''चंद्रकांत पाटील यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले. ''चंद्रकांत पाटील निवडणूक आयुक्त आहेत का? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना नवीन पद दिलंय का? निवडणुका कधी घ्यायच्या हे सांगणारे ते कोण? ते राष्ट्रपती आहेत का? शुभे बोल नाऱ्या असं आपण दिवाळीत म्हणतो. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या विजयाचा बॉम्ब फुटलाय. त्यामुळे त्यांना धक्का बसला असेल'' असंही संजय राऊत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.