मुंबई : नितेश आणि निलेश राणे यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) थेट पंतप्रधान मोदींना (PM Modi) सवाल विचारला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना टार्गेट दिलं असून शरद पवार (Sharad Pawar) हे त्यांचं टार्गेट आहे. आज पक्षात आलेली लहान लहान पोरं पवारांबद्दल ज्या भाषेत बोलतात ते पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मान्य आहे का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
नोटीसा आम्हाला पण येतात. पण आम्ही तमाशे केले नाही. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात अत्यंत सुडबुद्धीने वागतात. त्यांना टार्गेट दिले असून त्यानुसार तपास यंत्रणा काम करतात. शरद पवार हे तपास यंत्रणांचं टार्गेट आहे. त्यांना बदनाम करायचं आहे. काल पक्षात आलेली लोक पवारसाहेबांवर ज्या भाषेत बोलतात हे पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. मान्य नसेल तर त्यांनी पुढे येऊन खंडन केले पाहिजे. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण, जी भाषा शरद पवारांबद्दल वापरली जाते ती अत्यंत खालच्या स्तरावरील आहे. आम्ही काही बोललो तर आम्हाला पवारांचे चेले म्हणतात. हो आहे मी त्यांचा चेला. पण, तुम्हाला अशी असंसदीय भाषा वापरणं शोभतं का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
काही मुद्दे निवडणुकीच्या काळात येतात. काश्मीर आणि हिजाबचं प्रकरण मध्येच आलंय. अलिकडे धार्मिक मुद्द्यांवर जास्त भर दिला जातो. त्यावर निवडणुका लढवल्या जातात. गंगेत प्रेत वाहून गेली त्याप्रमाणे लोक सुद्धा वाहून जात आहे, हे चांगलं नाही. चार राज्यांत भाजपने मिळविली आहे. विजयाचा अजीर्ण होऊ नये. देशात विरोधी पक्ष राहणे हे गरजेचं आहे. विरोधी आणि सत्ताधारी शत्रू असल्यासारखं वागतात. हे चित्र संसदीय लोकशाहीसाठी चांगलं नाही. पण, देशाच्या सुरक्षेच्या आणि इतर मुद्द्यांवर एकमत करून सभागृहाचं कामकाज पुढे नेऊ, असं संजय राऊत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.