२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी घेतला होता. भल्या पहाटे हा शपथविधी घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी नेमकं काय घडलं? याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.(Latest Marathi News)
काय झालं, काय नाही हे महत्त्वाचं नाही. तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांना शरद पवार यांनी पूर्ण पाठिंबा दिला हेच सत्य आहे, असं रोखठोक उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. (Latest Marathi News)
तर राज्य सरकार कधीही पडेल म्हणून देवेंद्र फडणवीस झोपेत बडबडत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हंटलंय. शिंदे फडणवीस यांचं सरकार औटघटकेचं आहे, फडणवीस यांचा प्रयोग फसला आणि त्यांच्या अंगलट आला अशी टीका राऊत यांनी केली आहे.(Latest Marathi News)
संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केलीय. फडणवीस यांच्याकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. त्यांचं सरकार औटघटकेचं आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेण्यासाठी दिलेल्या मुदतीचा अर्धा वेळ संपला आहे. हे सरकार पडणार आहे. त्यामुळे फडणवीस झोपेत बडबडत असतील किंवा जागेपणी बडबडत असतील. त्याकडे फार लक्ष देऊ नका. शरद पवारांनी काही गोष्टी केल्या असतील तर ठिक आहे. त्यात नवीन काय? काय केलं पवार साहेबांनी? तुम्ही प्रयोग केला तुमचा प्रयोग फसला. ही एका ओळीची गोष्ट आहे. तुमचा प्रयोग तुमच्या अंगलट आला. लोकांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.(Latest Marathi News)
तर पुढे फडणवीस म्हणाले की, डबल गेमची गोष्ट सोडा. उद्धव ठकारे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार बनवलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी सरकार चालवलं. शरद पवार यांनी पूर्ण पाठिंबा दिला. हेच सत्य आहे, असंही संजय राऊत यांनी फडणवीस यांना खडेबोल सुनावले आहेत. (Latest Marathi News)
शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीचा प्लॅन झाला. 2019मध्ये भाजप राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. पवार यांची सहमतीने अजित पवार आणि मला सरकार बनवण्याचे अधिकार देण्यात आले होते. पण त्याआधीच शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली, शरद पवार सोबत येतील म्हणून अजित पवार आणि मी शपथ घेतली पण पवार साहेब सोबत आले नाहीत त्यामुळे आमच सरकार 72 तासात कोसळल असं फडणवीस म्हणालेत.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.