जे विरोधात उभे राहतात त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात, राऊतांचा घणाघात
देशात जे काही चाललं आहे ते लोकशाहीसाठी पुरक नाही. जे कोणी विरोधात उभे रहातील त्यांच्यावर धाडी टाकल्या जात आहेत. महाराष्ट्रातही असंच दबावाचं राजकारण सुरु आहे. त्यामुळे सरळ मार्शललॉ लावून हुकुमशाही जाहीर करा, असा टोला शिनसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. महाराष्ट्रात अगामी राज्यासभा निवडणुकीसाठी ईडी आणि सीबीआयचा वापर करतील का अशी भिती वाटत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहेत. (Sanjay Raut on Rajya Sabha Election)
नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार राऊत म्हणाले, सत्येंद्र जैन हे हिमाचलचे प्रभारी म्हणून तयारी करत होते. त्यांच्यामुळे भाजपला अडचण निर्माण झाली असती त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. जे विरोधात उभे राहतात त्यांच्यावर धाडी टाकल्या जात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात सुद्धा दबावाचं राजकारण सुरु आहे. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारनं सरळ मार्शल लॉ लावून हुकुमशाही जाहीर करावी. आता तर राज्यसभेसाठीही ईडीचा वापर होतोय का काय अशी भिती वाटत आहे. शिवसेना पक्षाचा सहावा उमेदवार महाविकास आघाडीने दिला असून ती जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावाही राऊतांनी केला आहे. त्यामुळे भाजपने कितीही घोडे उधळू द्या, आम्हीच जिंकणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रसे पक्षातील नाराजी संदर्भात ते म्हणाले, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये बाहेरचे उमेदवार आहेत. काँग्रेसला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. काँग्रेसने देशाचं नेतृत्व करावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे भाजपाने हे लक्षात घ्यावे की, राजाला फक्त प्रजा असते समर्थक नाहीत. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरमध्ये लोकांनी येऊ दिलं का? असं म्हणत त्यांनी पाटलांना टोमणा मारला आहे. संभाजीराजे आपण राजकारणात आहात. चढ-उतार येत असतात ते पचवता आलं पाहिजे. बुद्धीबळाचे पट आमच्याकडेही आहेत. सगळे खेळ आमच्याकडे आहेत, फक्त संगीत खुर्ची नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.