मुंबई : राज्यपालांना ( Governor Bhagat singh Koshyari ) सहीचा प्रॉब्लेम आहे, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारसी स्वीकारणं हे राज्यपालांना बंधनकारक आहे. राज्यपालांनी आम्ही दिलेल्या १२ आमदारांच्या नियुक्त्या का थांबल्यात? तुम्ही घटना कोणाला शिकवताय? आमच्यासारखं घटनेचं पालन करणारं कोणी नाही. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर (bjp) टीका केली आहे.
राज्यपालांना सहीचा प्रॉब्लेम; १२ आमदारांच्या नियुक्त्या का थांबल्यात? - राऊत
सरकारने शिफारस केलेले १२ सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे विरोधी पक्षाला वाटत आहे. आपल्या मर्जीतील सदस्यांची नियुक्ती भाजपला करायची आहे, त्यामुळेच या नियुक्त्या रखडल्याचा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला आहे. १२ जागांचे राजकारण आताच सुरू झाले आहे. दरम्यान संजय राऊत यांनी दैनिक 'सामना'तील 'रोखठोक' या सदरामधून वारंवार राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्याला हवा दिली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आमदारांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यास अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी सरकारला दिले आहेत. तसेच १२ सदस्यांची नियुक्ती ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबवली जाईल. अशी माहिती मिळत आहे.
गुजरात हेरॉइनवरून भाजप सरकारवर टीका
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मुंद्रा बंदरावर दोन कंटेनरमधून जप्त करण्यात आलेल्या तीन हजार किलोग्रॅम वजनाचे हेरॉइन (Gujrat heroine case) जप्त करण्यात आले. याची किंमत जवळपास २१ हजार कोटी रुपये असल्याची माहिती आहे. त्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena mp sanjay raut) यांनी भाजप सरकारवर सणसणीत टीका केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.