संजय राऊत निर्भीड आहे. ते कुणालाही घाबरत नाही. त्यांना आत्मविश्वास आहे की, न्यायालय न्याय देईल. यामुळेच ते आत्मविश्वासाने गेले. दोन्ही हात उंचावून त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला, असे रामदास कदम म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने राऊत यांना ४ ऑगस्टापर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. आठ दिवस कोठडीची गरज नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊतांवर कारवाई करण्यात आली आहे. राऊतांना घरचे जेवण आणि औषधही देण्यात येणार आहे. हृदयविकाराचे रुग्ण असल्याने रुग्णालयातही नेण्यात येईल.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली आहे. संजय राऊत यांनी सहकार्य न केल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीच्या वकिलांनी कोर्टात राऊतांवर सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे.
संजय राऊतांवर सुनावणी सुरू
ईडीने रविवारी रात्री उशिरा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली आहे.
जर राऊत दोषी आढळले असतील तर त्यांना कस्टडी दिली जाईल. आम्ही कधीही मागणी केली नाही त्यांना अटक करा. त्यांचे चुलत भाऊ मागील वर्षभरापासून तुरुंगात आहेत. चौकशी सुरू असतात तेव्हा पुरावे बदलण्याचा प्रयत्न करू नये. त्यांची क्लिप व्हायरल झाली त्यात ते ईडीला जो जवाब दिला तो बदलण्यास सांगत आहेत.बिल्डरला रोखण्याचे काम या कारवाईतून होत आहे. केवळ राजकीय व्यक्तीवर कारवाई झाली असे नाही. जे निर्दोष असतील त्यांनी पुरावे सादर करावे. त्यांनी कुठल्यातरी पक्षात सहभागी व्हावे म्हणून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यांना कोणताच पक्ष सामील करुन घेणार नाही. केवळ राष्ट्रवादीमध्ये त्यांना घेतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी गेले आहेत. ते राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे ईडी मुख्यालयात दाखल झाले आहेत. काही वेळातच संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात येणार आहे. राऊतांच्या अटकेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. नाशिकमध्ये, तसंच औरंगाबादमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन केलं जात आहे.
महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे आणि हे जगजाहीर आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. कोकणात आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा पोहोचली आहे. तिथे त्यांच्या सभाही होणार आहेत.
संजय राऊतांना राष्ट्रवादी सोडून कोणीच आपल्या पक्षात घेणार नाही. त्यांची भाषा फारच आक्षेपार्ह असते. ज्या पक्षाबरोबर आपण सत्तेत बसलोय, त्यांच्याबद्दल रोज पत्रकार परिषद घेऊन आक्षेपार्ह बोलणं हे सातत्याने त्यांनी केलंय. त्यामुळे भाजपा शिवसेनेचे संबंध दुरावले असल्याची मला खात्री आहे. त्यांची शिवसेनेसोबतची निष्ठा तपासून घेण्याची गरज आहे. शिवसेनेला खूप त्रास झालाय. ते तुरुंगात असताना त्यांच्याबद्दल चुकीचं बोलणं योग्य नाही. त्यामुळे त्यांनी आपण निर्दोष असल्याचे पुरावे द्यावेत, वकिलांतर्फे बाजू मांडावी, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.
संजय राऊत यांच्या घरी काल ईडीचे अधिकारी कारवाई करण्यासाठी गेले असताना शिवसैनिकांनी राऊतांच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणात जमून निदर्शने केली होती. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात शिवसैनिकांविरोधात बेकायदेशीरपणे गर्दी जमवून शासकीय कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी अधिकारी राऊत यांना घेऊन जात असताना अडथळा निर्माण केल्याचाही आरोप केला गेला आहे.
प्रभु रामचंद्राच्या दर्शनासाठीचे पैसे स्वतःच्या घरात दडवून ठेवणारा संजय राऊत हा समस्त हिंदू समाजावर कलंक आहे. रामाच्या नावावर पैसे खाणाऱ्या या भामट्याला उद्धव ठाकरे अजूनही पक्षात ठेवणार का? असा सवाल भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला आहे.
ईडी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलाय. स्थानिक पोलिसांसह राईट कंट्रोल पोलीस तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक शिवसेना कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली असून, विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ ईडी कार्यालयाजवळ दाखल झाले आहेत.
औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले की, तो ८ वाजताचा भोंगा आता बंद झाला आहे. शिवाय ज्यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला, ते आपापल्या कर्माने जातील.
राऊतांच्या अटकेनंतर मातोश्रीवर तातडीची बैठक होणार आहे. काल मातोश्रीबाहेर तसंच संजय राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठा गराडा घातला होता. तिथे संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या जात होत्या. १६ तासांच्या चौकशीनंतर रात्री अखेर संजय राऊतांना ईडीने अटक केली आहे.
गोरेगाव इथल्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने काल रात्री उशिरा अटक केली. राऊत यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येईल. १६ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. (Sanjay Raut arrested by ED)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.