Sanjay Raut Video : 'असा' असेल इंडिया आघाडीचा लोगो; संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण

sanjay raut
sanjay rautEsakal
Updated on

मुंबईः येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईमध्ये संपन्न होत आहे. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल, यासंबंधीची माहिती आज संजय राऊतांनी दिली.

भाजप आणि नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी देशभरातील विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटण्यात झाली होती. दुसरी बैठक कर्नाटकच्या बंगळूरुमध्ये झाली. तर आता तिसरी बैठक मुंबईमध्ये होत आहे.

sanjay raut
Maharashtra Rain Update : राज्यात यंदा 27 टक्के पाऊस कमी; धरणसाठाही 20 टक्के मागेच

मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक संपन्न होईल. उबाठा गट, महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बैठकीचे यजमान आहेत.

मुंबईतल्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल आणि समन्वय समितीची घोषणा होईल. महत्त्वाचं म्हणजे आघाडीचा नेता याच बैठकीच घोषित केला जावू शकतो. लोगो कसा असेल? याबद्दल संजय राऊत यांनी आज माहिती दिली.

sanjay raut
Chhagan Bhujbal : भुजबळांचं भाषण थांबवणाऱ्या बीडकरांना आव्हाडांचा सलाम; म्हणाले, ज्यांचं खाल्लं, प्यायलं...

संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीचा लोगो भारतीयांसाठी प्रेरणादायी असणार आहे. त्याचं अनावरण ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. देशातील जनता आणि युवकांना प्रेरणा मिळेल, असं लोगोचं डिझाईन करण्यात आल्याची माहिती राऊतांनी दिली.

दरम्यान, इंडिया आघाडीसोबत बंगळूरुच्या बैठकीत २६ पक्ष सहभागी झाले होते. आता आणखी पक्ष वाढणार असल्याचं आघाडीच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपनेदेखील एनडीएची नव्याने बांधणी करण्यात सुरुवात केली आहे. एनडीएमध्ये ३८ पक्ष असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आलेला होता. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही गटांकडून जोरात तयारी सुरु असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.