संसदेची सुरक्षा भेदल्याची घटना काल (बुधवारी) दिल्ली येथे घडल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. आधिवेशनाचं कामकाज सुरू असतानाच दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात त्या बाकांवर उडी घेतली त्यानंतर लोकसभेत एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षितेवर मोठं प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहे. या धक्कादायक प्रकारानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.(Latest Marathi News)
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या संपुर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'आताची वास्तू संसदभवन वाटतच नाही. संसदेची नवीन इमारत माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे', असं संजय राऊतांनी बोलताना म्हटलं आहे.
काय म्हणालेत संजय राऊत?
'नवी संसद माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे. जुनी संसद अधिक सुरक्षित होती. संसदेत जाताना एक फिल यावा लागतो तो तिथं येत नाही. मला जुन्या संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रसाद, नेहरू बसलेले दिसत होते. नव्या संसदेत तसं काही दिसत नाही'. (What did Sanjay Raut say?)
'या देशात सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. सीमा, सीमावर्ती राज्य, लोक आणि काल पार्लमेंट, आता सरकारची वाचा गेली आहे. सरकार मुक आणि बधीर झालं आहे, ते निवडणूक प्रचार, शपथविधी यामध्ये व्यस्त आहे. आता जनतेला समजलं असेल की, हे सरकार किती तकलादू पायावर उभा आहे. आता जनतेला समजलं असेल जम्मू काश्मीर, लढाख, म्यानमार मध्ये अतिरेकी कसे घुसतात.'
काल त्या तरुणांनी गॅलरीतून उड्या मारल्या. कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कुठंही जाऊ शकतं. हे काल दिसलं. ज्या तरुणांना पकडलं त्यांचा मार्ग चुकीचा...त्यांनी मांडलेल्या भावना देशाच्या होत्या. त्यातील एक मुलगी PHD करत आहे. तिला अजित पवार यांनी मार्गदर्शन करावं, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी अजित पवारांनी लगावला आहे.
काल जे झालं ही अराजकाची सुरुवात आहे. त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे आमच्या दृष्टीने हा अतिरेक आहे. या तरुणांकडून झालेला अतिरेक देशासाठी घातक आहे. त्यांचं समर्थन आजिबात नाही, असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.