शिवसेनेत फुट पडून १ वर्ष पूर्ण झालं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार आणि खासदार यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केलं. या बंडामुळे शिवसेनेत मात्र दोन गट निर्माण झाले. अशातच ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटातील आमदारांकडुन ऐकमेकांवर वारंवार बोचरी टीका केली जाते. पण या सर्व घडामोडींची तक्रार ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे.(Latest Marathi News)
'हॅलो बाळासाहेब, तुम्ही आम्हा लोकांना सांगितलं, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. ज्या धनुष्यबाणाची आपण पूजा करत होतात. तो धनुष्यबाण स्वत:ला महाशक्ती म्हणवणाऱ्यांनी चोरला', अशी तक्रार करतानाच राऊत यांनी आश्वासन देताना म्हंटलं कि, 'बाळासाहेब तुम्ही खात्री बाळगा. आमचा कणा अजून मोडलेला नाही, तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल', असं संजय राऊत यांनी बाळासाहेबांना म्हंटलं आहे.(Latest Marathi News)
झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीला तुम्हाला फोन लावण्याची संधी मिळते. हा फोन काल्पनिक असतो. त्यामुळे तुम्ही हयात असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तीला फोन करू शकता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अवधूत गुप्ते यांनी तुम्ही कुणाला फोन लावाल, असा प्रश्न विचारला. तेव्हा संजय राऊतांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांना फोन लावला. या फोनमध्ये त्यांनी काही तक्रारी केल्या. तर काही आश्वासनं देखील दिली आहेत.(Latest Marathi News)
तर पुढे संजय राऊत म्हणाले की, 'एक वाक्य तुम्ही नेहमी शिवसैनिकांना सांगायचा की, आपण सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. तर सत्ता आपल्यासाठी जन्माला आलेली आहे. असं तुम्ही आम्हाला कायम सांगितलं. ते ध्यानात ठेवून आम्ही वाटचाल करू', असा शब्दही संजय राऊतांनी बाळासाहेबांना दिला आहे.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.