Sanjay Raut Bail: संजय राऊत यांना जामीन मंजूर; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Shivsene Leader: मीरा-भाईंदर येथे शौचालय बांधकाम प्रकरणी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणी २०२२ मध्ये राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांशी संबंधीत संस्थेने १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचे आरोप केले होते.
Sanjay Raut
Sanjay Rautesakal
Updated on

Kirit Somaiya: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना अब्रूनुकसानीच्या प्रकरणामध्ये कोर्टाने पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात आता त्यांना दिलासा मिळाला असून जामीनही मंजूर झाला आहे.

१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. याशिवाय वरच्या कोर्टामध्ये दाद मागण्यासाठी 30 दिवसांचा कालावधीची मुभा देण्यात आलेली आहे. माझगाव कोर्टाने हा निर्णय दिला.

मेधा सोमय्या यांची तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नते संजय राऊत यांना १५ दिवसांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली होती. महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांना डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवत त्यांना न्यायालयाने १५ दिवसांचा कारावासाची आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

नेमकं प्रकरण काय?

मीरा-भाईंदर येथे शौचालय बांधकाम प्रकरणी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. या प्रकरणी २०२२ मध्ये राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांशी संबंधीत संस्थेने १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचे आरोप केले होते. यानंतर मेधा किरीट सोमय्या यांनी न्यायालयात धाव घेत संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. तो दावा आता निकाली निघाला असून, त्यानंतर राऊत यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.