Sanjay Raut: "छत्रपती शिवराय जाताना त्यांची तलवार शिवसेनेला देऊन गेले"; संजय राऊतांचे जळगावात वक्तव्य

Sanjay Raut
Sanjay Raut
Updated on

Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जळगावात जाहीर सभा घेतली. शिवसेनेचे दोन गट झाल्यांनतर उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला जळगावात जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, मुंबईत बसून देशाचे राजकारण करणारे दोनच नेते देशात झाले. एक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आम्हाला सारखं दिल्लीला जाव लागत नाही, आमचं राजकारण मातोश्रीवरुनच होते. सारख लोक म्हणायचे जळगावची शिवसेना संपली. मात्र चार टकले गेले ती शिवसेना नाही. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभाई पटेल, यांचे पुतळे उभारू नये म्हणून या चार टकल्यांनी प्रयत्न केले.

उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिंकलं आहे. १६६६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्राला जायला निघाले. तेव्हा त्यांचा मुक्काम जळगाव, खांदेशात होता. त्यामुळे ही शिवसेना शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती जी तलवार होती. जाताना ती तलवार ते शिवसेनेला देऊन गेले आहेत. तलवारीला तलवार भिडेल एवढी ताकद शिवसेनेत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

विधानसभा, लोकसभा आम्ही जळगावत जिंकणार आहोत. आज जळगाव भगवे झाले आहे. आजच्या सभेने ४ टकल्यांना धडकी भरली असेल. ते उद्यापासून बाहेर पडणार नाहीत. उद्धव ठाकरे देशाचे नेतृत्व स्विकारतील. सत्ता येते आणि जाते मात्र सत्ता परत आणण्याची धमक शिवसेनेत आहेत. ४ गेले पण आम्ही १० निवडून आणू, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. (Latest marathi news)

Sanjay Raut
Kunbi Caste Certificate: कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रिया काय? 'असे' तपासा पुरावे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.