खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. त्यांच्या या सुटकेनंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. अशातच संजय राऊत यांच्या भांडुपमधील घराबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, राऊत यांच्या मातोश्रींनी "माझा मुलगा येतोय... आनंद आहे...", अशी प्रतिक्रीया दिली आहे. (Sanjay Raut mother first reaction after Patra Chawl Land Scam Case Mumbais Pmla Court Grants Bail )
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊतयांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे. संजय राऊत यांना अखेर जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर राऊत यांच्या मातोश्री यांनी खिडीमध्ये येऊन आपला आनंद व्यक्त केला. जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा आनंद व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळले.
तसेच, एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी आपली भावना केवळ दोन शब्दात व्यक्त केली. "माझा मुलगा येतोय... आनंद आहे...", अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी राऊत यांनी आपल्या आईला पत्र लिहिलं होतं. आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि हे महिनोन महिने घरी येत नाहीत.
काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्नायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागते. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडून घेतला नाही का?,” असे संजय राऊत आपल्या पत्रात म्हटले होते.
राऊत यांना पत्रावाला चाळ प्रकरणी 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. त्यांच्या कुटुंबीयांशिवाय त्यांना कुणालाही भेटू दिले जात नव्हते. मध्यंतरीच्या काळात राऊत यांच्या वतीने जामिनासाठी कोर्टात वारंवार अर्जही करण्यात आले. पण त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता. मात्र, आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतून आनंद व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.