आज राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली दरम्यान राज्यात या निवडणूकीवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्नात अशलेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, मात्र या प्रयत्नांना यश आलेलं नाही, यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इतिहासात कॉंग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला होता, या बद्दल विचारला असता राऊत म्हणाले की, तेव्हा गुप्त पध्दतीने मतदान होते आता पक्षाची मते आता इकडे तिकडे होणार नाहीत असे राऊत यावेळी म्हणाले.
निवडणूक होणार म्हटलं की अशा बैठका होतात असे देखील त्यांनी सांगितले. विरोधी पक्ष महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयोग करत असतं. सरकार अस्थिर करण्यासाठी विनाकारण निवडणूक लादल्या जातात, आमदारांना अमिष दाखवण्यासाठी निवडणूका लादल्या जातात निवडणूका न घेताही असे निर्णय घेता येतात, महराष्टात असे अनेकदा झाले आहे. भाजपने नवा पायंडा पाडला आहे, तसेच लहान पक्ष आणि अपक्षांचा जो आकडा आम्हला हवा आहे तो आमच्या हातात आहे असे राऊत यावेळी म्हणाले.
आज सकाळी आम्ही खूप प्रयत् घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हे आज सकाळी भाजपच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले आणि चर्चा केली. काही प्रस्तावांचं अदानप्रदान झालं. दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. पण आता निवडणूका होत आहेत, त्यामध्ये महाविकास आघाडीचे चार नेते निवडून येतील असे राऊत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.