Nawab Malik : "नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे ते सुटले"; मलिकांना १६ महिन्यांनंतर जामीन, ठाकरे गटाच्या नेत्याचं खोचक वक्तव्य

nawab malik
nawab malikesakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलीक यांना मनी लाँड्रींगच्या गुन्ह्यात तब्बल १६ महिन्यांनंतर जामीन मंजूर झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांना नवीन इंजेक्शन मिळाल्याने ते सुटल्याचे म्हटले आहे. राऊतांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात आहे. त्यांना जामीन मिळाल्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे ते सुटले, ते असतील प्रफुल्ल पटेल असतील...काल म्हणे केंद्र सरकारने देशद्रोहाचा ब्रिटीशकालीन कायदा रद्द केला, पण त्या कायद्याला मागे टाकणारे कायदे वापरून तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांना अकडवत आहात. त्यामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द केला याचं कौतुक सांगू नका. नवाब मलिक १६ महिन्यांनंतर सुटले पण जे वाटेवर होते, त्यांना आपण मंत्री केलं, असेही संजय राऊत म्हणाले.

nawab malik
MPSC Exam Fees News : रोहित पवारांची फडणवीसांकडे मागणी, अजितदादांनी केली पूर्ण; दिल्या महत्वाच्या सूचना

नवाब मलिक यांना जामीना मिळण्यामागे काय राजकारण आहे याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, त्याबद्दल स्वतः नवाब मलिकच बोलतील. आम्हाला आनंद आहे की, राजकारणातल्या सहकाऱ्यास १६ महिन्यानंतर मोकळा श्वास घेता येईल याचा आनंद आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी १६ महिन्यानंतर आरोग्याच्या कारणास्तव जामीन मिळाला ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यांची तब्यत खराब होती. १६ महिने एक आमदार, मंत्री तुरुंगात ठेवलं जातं, ट्रायल सुरू होत नाही. हा कुठला कायदा आहे? राजकीय विरोधकांविरोधात हा डाव ज्या कायद्याच्या आडून खेळला जातो तो ब्रिटीशांपेक्षा देखील भयंकर आहे.

nawab malik
Maharashtra Rain Update : विदर्भात पावसाची ७ दिवसांपासून विश्रांती; जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती

करुलकरला वाचवण्यासाठी कायदा हटवला?

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी माहिती दिली की. ब्रिटीशकाळातील देशद्रोहाचा कायदा रद्द केला. चांगली गोष्ट आहे. देशात कोणी देशद्रोही नाहीये. ज्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावायचा होता त्याविरोधात लावला नाही. पुण्यात प्रदिप कुरुलकरने पाकिस्तानला येथून संरक्षण क्षेत्रातील गुपित पोहचवली, तो आरएसएसचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याच्या विरोधात तर देशद्रोहाचा कायदा वापरला नाही. त्याला वाचवण्यासाठी तर हा कायदा हटवला नाही ना? असे बरेच लोक आहेत. देशद्रोहाचा कायदा कोणासाठी हटवला? असे राऊत म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.